26 ऑक्टोबर : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची राजस्थानमध्ये पहिला सभा पार पडली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. युवराज (राहुल गांधी) यांना वाटलं फॅमिली सिरिअल कामा येतील म्हणून प्रचार सभांमध्ये लोकांना भावूक करून फॅमिली सिरिअल सुरु केल्या आहे अशा शब्दात मोदी यांनी राहुल यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.
तसंच युवराज अगोदर राजस्थानमध्ये येऊन गेले ते काय बोलले, कशाबद्दल बोलले हे कुणालाच कळालं नाही. काँग्रेसच्या नेत्यांनाही ते काय बोलले हेच समजत नाहीए. युवराज आता देशाच्या अखंडतेबद्दल भाषण देत आहे पण त्यांना त्यांचेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास नाही अशा नेत्यांवर कोण विश्वास ठेवणार ?, युवराज हे गोपालगडमध्ये पोहचले होते तेव्हा ज्या मोटारसायकलीवरुन ते फिरले होते ती सायकल चोरीची होती असा टोलाही मोदींनी लगावला.
मोदी पुढे म्हणाले, कांद्याच्या दरवाढीलाही केंद्र सरकारच जबाबदार आहे, कांद्यांच्या कपातीत फक्त 5 टक्क्यांचा फरक पडलाय पण किंमती पंधराशे टक्क्यांनी वाढवलाय. जास्त कांद्याचं उत्पादन हे आंध्र, कर्नाटकमध्ये घेतलं जातं आणि ही राज्य काँग्रेसशासीत आहे. या दरवाढीला काँग्रेसचेच लोक जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला. तसंच काँग्रेस सरकारने जनतेचं जगणं मुश्किल केलंय या सरकारला आता खाली खेचण्याची वेळ आलीय अशी टीकाही मोदींनी केली.