Elec-widget

मोदींना टक्कर देण्यासाठी राहुल यांची दिग्गजांची फौज

मोदींना टक्कर देण्यासाठी राहुल यांची दिग्गजांची फौज

 • Share this:

rahul team"2014 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने राहुल गांधी यांनाच पक्षाचा ब्रँड बनवण्याचं ठरवलंय. त्यासाठी राहुल गांधी यांच्या मागे काँग्रेसने दिग्गजांची मोठी फौज उभी केलीय. यासाठी राहुल यांची कोअर टीम तयार करण्यात आलीय. यात जाहीरनाम्यासाठी, भाषणाचे मुद्दे, सोशल इंजिनिअरिंग, राजकीय समन्वय, सल्लागार आणि निवडणूक समन्वय समिती अशी फौज तयार करण्यात आली."

26 ऑक्टोबर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालीय. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. पण खरा मुकाबला आहे तो भाजप आणि काँग्रेसमध्ये. पण ही लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस अशी न होता ती नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच होत आहे. याचा प्रत्यय अलीकडेच झालेल्या दोन्ही नेत्यांच्या सभांमधून आलाय.

 

राहुल गांधी पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने राहुल गांधी यांनाच पक्षाचा ब्रँड बनवण्याचं ठरवलंय. त्यासाठी राहुल गांधी यांच्या मागे काँग्रेसने दिग्गजांची मोठी फौज उभी केलीय.

 

Loading...

यासाठी राहुल यांची कोअर टीम तयार करण्यात आलीय. यात जाहीरनाम्यासाठी, भाषणाचे मुद्दे, सोशल इंजिनिअरिंग, राजकीय समन्वय, सल्लागार आणि निवडणूक समन्वय समिती अशी फौज तयार करण्यात आली. निवडणूक समन्वय समितीत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, अहमद पटेल, जनार्दन मधुसुदन मिस्त्री, जनार्दन द्विवेदी, जयराम रमेश, सी.पी.जोशी,अजय माकन अशा नेत्यांचा भरणा आहे.

 

राहुल गांधींची कोअर टीम

 

 • मोहन गोपाल - जाहीरनामा आणि भाषणाचे मुद्दे
 •  के.राजीव - सोशल इंजिनीअरिंग
 • जितेंद्र सिंह - राजकीय समन्वय
 • कनिष्क सिंह - राजकीय सल्लागार

निवडणूक समन्वय समिती

 • दिग्विजय सिंह
 • अहमद पटेल
 • जनार्दन मधुसुदन मिस्त्री
 • जनार्दन द्विवेदी
 • जयराम रमेश
 •  सी.पी.जोशी
 • अजय माकन

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2013 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...