फ्रायडे रिलीज

फ्रायडे रिलीज

5 फेब्रुवारी, मुंबई शुक्रवार जवळ आला की कोणते सिनेमे रिलीज होणार आहेत, याचे वेध लागतात. यावेळी जास्त ऑप्शन्स आहेत ते हॉलिवूड सिनेमांचे. या हॉलिवूड सिनेमांबरोबरीनं मराठी आणि हिंदी सिनेमाही रिलीज होत आहे. ' होतं असं कधी कधी ' हा मराठी सिनेमा या आठवड्यात रिलीज होतोय. सिनेमाची कथा एका करिअरिस्टिक स्त्रीची आहे. फक्त ऑफिस हेच आयुष्य असणार्‍या या स्त्रीचे एक छोटा मुलगा कसे डोळे उघडतो, हे सिनेमात दाखवलंय. भाग्यश्री देसाई सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. प्रशांत दामले आणि डॉ. मोहन आगाशे सिनेमात पाहुणे कलाकार आहेत.बॉलिवूडमध्ये मोठा सिनेमा म्हणजे देव डी. अनुराग कश्यपने त्याच्या या सिनेमात आधुनिक देवदास रंगवला आहे. देव डी. मध्ये मुख्य भूमिका अभय देओल याची आहे. माही गिल आणि कल्की या दोन नव्या हिरॉइन्सही देव डी. मध्ये आहेत. माही पारो बनलीय तर कल्की चंदा. यातल्या बोल्ड दृश्यांमुळे सिनेमाला ए सर्टिफिकेट मिळालेय.हॉलिवूड सिनेमांमध्ये 'आऊटलँडर ' रिलीज होतोय. परग्रहावरून आलेली माणसं आणि पृथ्वीवरची माणसं एकत्र येऊन त्यांच्यावर अन्याय करणार्‍यांशी सामना करतात अशी या सिनेमाची वन लाइन आहे. होवर्ड मोक्केन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ऍक्शन आणि साय-फाय असलेल्या या सिनेमात जेम्स काव्हायझेल, सोफिया मायलेस यांच्या भूमिका आहेत. ' अंडरवर्ल्ड ' या सिनेमात दोन जातींच्या दानवांचं युद्ध आहे आणि एक चेटकीण शत्रूपक्षातल्या दानवाच्या प्रेमात पडते, पण ठराविक उद्देशानं. ही या सिनेमाची वन लाइन स्टोरी आहे. लेन वाइजमननं ' अंडरवर्ल्ड 'चं दिग्दर्शन केलं आहे. याही सिनेमात स्पेशल इफेक्टसचा भरपूर वापर आहे. द टेन कमांडमेंट्स ही ऍनिमेटेड फिल्मही या सिनेमात प्रदर्शित होत आहे. बील्ल बोकाई आणि जॉन स्ट्रोन्च यांचं दिग्दर्शन सिनेमाला लाभलं आहे. एका सामान्य माणसाच्या असामान्यपणाची ही कथा सिनेमात दाखवली आहे. बायबलचा आधार या सिनेमाला आहे.बरेच काल्पनिक जगावरचे सिनेमे हॉलिवूडमध्ये रिलीज होतायतच. पण काही सिनेमे नेहमीच्या आयुष्यांवरचेही सिनेमा हॉलिवूडमध्ये रिलीज होत असतात. त्यापैकीच एक आहे ' मार्लीऍण्ड मि '. हा सिनेमा एक कुटुंब आणि त्याच्या कुत्र्याभोवती फिरतो. या कुत्र्यापासून ते बरंच काही शिकतात, अशी कथा आहे. डेविड फ्रँकेलनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ओवेन विल्सन आणि जेनिफर ऍनिस्टॉन यांच्या भूमिका आहेत. ' हाऊ टु लूझ फ्रेंड्स ऍण्ड एलिएनेट पिपल ' या सिनेमाचं दिग्दर्शन रॉबर्ट विडनं यांनी केलं आहे. सिडनी यंग हा तरुण एक ग्लॅमरस मासिक चालवतोय. अचानक त्याला एका परंपरावादी मासिकातून नोकरीची ऑफर येते. हा एवढा मोठा बदल तो कसा स्वीकारतो, अशी ही कथा आहे..पाच हॉलीवूड सिनेमे, टाईमपास हिंदी सिनेमे आणि एक मराठी सिनेमा असे वीकेन्डसाठी भरपूर ऑप्शन आहेत.

  • Share this:

First published: February 5, 2009, 4:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या