शोभन सरकार यांच्या 'स्वप्ना'चा आदर, मोदींचं घूमजाव

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2013 04:12 PM IST

Image modi345234_300x255.jpg21 ऑक्टोबर : उत्तरप्रदेशमध्ये उन्नावमध्ये सुरू असलेल्या स्वप्नातल्या सोन्यासाठी खोदकामावरून राजकारण सुरू झालंय. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी 'स्वप्नातल्या सोन्याच्या' शोधावर अगोदर टीका केली आता मात्र त्यांनी घूमजाव केलंय. लाखो भाविकांचा शोभन सरकार यांच्यावर विश्वास आहे. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. परदेशी बँकांमध्ये लपवलेल्या काळ्या पैशांबद्दल श्वेतपत्रिका काढावी अशी माझी सरकारला विनंती आहे असं स्पष्टीकरण मोदी यांनी दिलंय.

 

शोभन सरकार या साधूला स्वप्न पडल्यानंतर सरकारनं सोन्याच्या शोधासाठी खोदकाम सुरू केल्याची टीका होतेय. यात नरेंद्र मोदींही उडी घेतली. स्वप्नातलं सोनं शोधण्यापेक्षा स्वीस बँकेतला काळापैसा भारतात आणावा अशी टीका केली होती. तसंच मोदींच्या या टीकेनंतर त्याला उत्तर म्हणून शोभन सरकार यांनी मोदींनी खुलं पत्र लिहिलंय.

 

देशाला महासत्ता बनवण्यासाठी शोभन सरकार यांनी सोन्याची माहिती सरकारला दिली असा दावा त्यांचे सहकारी ओमजी बाबा यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना केलाय. त्यानंतर नरेंद्र मोदींनी ट्विट करून माघार घेतली. आपण शोभन सरकार यांच्या समर्थकांच्या भावनांचा आदर करत असल्याचं त्यांनी त्यात म्हटलंय. दरम्यान, वैज्ञानिक पद्धतीनं सर्वेक्षण करूनच हे खोदकाम केलं जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

Loading...

मोदींनी काय ट्विट केलंय?

लाखो भाविकांचा शोभन सरकार यांच्यावर विश्वास आहे. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. परदेशी बँकांमध्ये लपवलेल्या काळ्या पैशांबद्दल श्वेतपत्रिका काढावी अशी माझी सरकारला विनंती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2013 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...