तेलंगणाविरोधी आंदोलनाचा फटका,5 जिल्ह्यात वीजपुरवठा ठप्प

तेलंगणाविरोधी आंदोलनाचा फटका,5 जिल्ह्यात वीजपुरवठा ठप्प

  • Share this:

telangana simandrha08 ऑक्टोबर : आंध्र प्रदेशातील तेलंगणाविरोधी निदर्शनं आता आणखी तीव्र झाली आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. जवळपास आठ हजार वीज महामंडळाचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे आंध्र प्रदेशातल्या 5 जिल्ह्यांमधला वीजपुरवठा ठप्प झालाय.

 

या पाच जिल्ह्यांमधल्या 50 लाख घरांमध्ये सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून वीज नाहीये. सीमांध्रमधल्या काही हॉस्पिटल्सना वीजपुरवठा नसल्याचा जोरदार फटका बसलाय. वीजपुरवठा नसल्यामुळे येथील नवजात अर्भकांच्या तसंच इनक्युबेटर्सच्या विभागांना फटका बसला आहे.

 

दरम्यान, तेलंगणाच्या निर्णयाविरोधात राजीनामा दिलेल्या मंत्र्यांचे राजीनामे पंतप्रधान स्वीकारण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट होतंय.

First published: October 8, 2013, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading