जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

  • Share this:

keran 407 ऑक्टोबर : जम्मू आणि काश्मीरच्या केरन भागात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. लष्करानं केलेल्या कारवाईत हा सगळा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 7 एके 47 रायफल्स, रेडिओ सेट्स, पिस्तुलं बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 

गेल्या 14 दिवसांपासून या भागात 7 एके 47 रायफल्स, रेडिओ सेट्स, पिस्तुलं बंदुकीच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. या परिसरातल्या सर्व नागरिकांना इथून हटवण्यात आलंय. शाला बाटू गावामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाल्याचं लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितलंय.

 

यापूर्वी शाला बाटूच्या जवळ गुज्जर-दूर इथं तीन दहशतवाद्यांना घुसखोरीचा प्रयत्न करत असताना ठार करण्यात आलंय. तर शाला बाटूपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेह गली इथंसुद्धा घुसखोरीचा प्रयत्न झालाय. पाकिस्तानी लष्करानं 30 ते 40 दहशतवादी भारतात घुसवले असल्याचा सैन्याचा आरोप आहे. पाकिस्ताननं मात्र हे आरोप फेटाळले आहे.

 

दहशतवादी आणि लष्करादरम्यान चकमक सुरूच

जम्मू आणि काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन सेक्टरमध्ये गेल्या 14 दिवसांपासून दहशतवादी आणि लष्करादरम्यान चकमक सुरू आहे. केरनमधल्या एका गावात 23 सप्टेंबरला नियंत्रण रेषेपलीकडून 40 ते 50 दहशतवाद्यांनी घुसखोरी केलीय. त्यांना हुसकून लावण्यासाठी लष्कराची 14 दिवसांपासून कारवाई सुरू आहे. कारवाई अंतिम टप्प्यात आल्याचं गेल्याच आठवड्यात लष्करानं सांगूनही कारवाई अजून संपलेली नाहीय.

 

कारगील नंतरची नियंत्रण रेषेवरची ही सर्वात मोठी घुसखोरी आहे. इथल्या चकमकीचा फटका केरन सेक्टरमधल्या गावांना बसलाय. जामगुंडचे गावकरी गाव सोडून पळून गेलेत. ही कारवाई सुरू असतानाच गेल्याच आठवड्यात शल्लाबाटू या गावात लष्करानं अतिरेक्यांचा आणखी एका घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दुसरीकडे पाकिस्ताननं मात्र घुसखोरीची बातमी निराधार असल्याचं म्हटलंय. दरम्यान, तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांनी आज संध्याकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. आणि त्यांना परिस्थितीची कल्पना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2013 10:04 PM IST

ताज्या बातम्या