तेलंगणाचा प्रश्न पेटला, जगनमोहन रेड्डींचं बेमुदत उपोषण सुरू

तेलंगणाचा प्रश्न पेटला, जगनमोहन रेड्डींचं बेमुदत उपोषण सुरू

  • Share this:

reddy fasting05 ऑक्टोबर : स्वतंत्र तेलंगणाविरोधात वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी आजपासून हैदराबादमध्ये बेमुदत उपोषण सुरू केलंय. कॅबिनेटच्या निर्णयामुळे आंध्रसमर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयाची तोडफोड केली. प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन आंदोलनात भाग घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

 

सीमांध्रमधल्या केंद्रीय मंत्रिमंडळातल्या 5 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. तेलुगु देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनीही सोमवारपासून दिल्लीत उपोषण करणार असल्याची घोषणा केलीय. दरम्यान, सीमांध्रमध्ये पुरकारलेल्या 72 तासांच्या बंदचा आजचा दुसरा दिवस आहे. विरोध होत असला तरी आंध्रचं विभाजन करण्याच्या निर्णयावर केंद्र सरकार ठाम आहे.

 

तेलंगणाला मंजुरी दिल्यानंतर सीमांध्रामध्ये 72 तासांचा बंद पुकारण्यात आला. सीमांध्र भागात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. पूर्ण 13 जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. अनेक ठिकाणी टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामार्‍या आणि संघर्षाचे प्रकार घडलेत. या बंदमुळे परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प झालीय. तर दुसरीकडे देशभरातून तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविक यामुळे अडकून पडले आहे.

First published: October 5, 2013, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading