27 सप्टेंबर : राहुल गांधी आज म्हणतात वटहुकूम नॉन्सेन्स आहे आणि काँग्रेस पक्ष जर हे मानत असेल तर त्यांनी एकाच महिन्यात दोनदा नॉन्सेन्स प्रकार केलाय. जर इतकच जिव्हारी लागलं असेल तर काँग्रेस आपल्या गुन्हेगार नेत्यांची हकालपट्टी करेल का? जर असं होत नसेल तर साहजिकच हा प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न असून निव्वळ नौटंकी आहे अशी टीका भाजपचे नेते अरूण जेटली यांनी केली. आता राहुल यांच्या भूमिकेनंतर पंतप्रधानांनी आत्मपरिक्षण करावं असा सल्लावजा टोलाही जेटलींनी लगावला.