S M L

भाजपमध्ये मोदी पर्व, अडवाणी एकाकी !

Sachin Salve | Updated On: Sep 13, 2013 09:58 PM IST

भाजपमध्ये मोदी पर्व, अडवाणी एकाकी !

modi vs advani13 सप्टेंबर : नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा जरी झाली असली तरी सुद्धा त्यांच्या उमेदवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध कायम आहे. मोदींच्या नावाची घोषणा करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेकडे अडवाणींनी पाठ फिरवली. संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीला अडवाणी गैरहजर राहिले आणि मोदींना विरोध कायम असल्याचं दाखवून दिलं. अडवाणी यांनी राजनाथ सिंहांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली.

 

मी तुम्हाला माझ्या मनातली व्यथा आणि तुमच्या कामाच्या पद्धतीबाबतची माझ्या नाराजीविषयी बोललो होतो. मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की,बैठकीला येऊन सगळ्या सदस्यांसमोर आपलं म्हणणं मांडायचं की नाही, यावर मी विचार करेन. आता मी निर्णय घेतलाय की या बैठकीला न येणंच योग्य आहे अशा शब्दात अडवाणींनी आपली नाराजी व्यक्त केली. 

पण भाजपच्या नेतृत्त्वाने अडवाणींच्या विरोधाला केराची टोपली दाखवून मोदींच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर खुद्द नरेंद्र मोदी यांनी यांनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. 20 मिनिटं ही भेट चालली. त्यानंतर ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या घरी गेले. त्यानंतर ते अहमदाबादला रवाना झाले. विशेष म्हणजे गोव्यात प्रचारप्रमुख पदासाठी मोदींच्या निवडीच्या वेळेसही अडवाणींनी विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन एकच स्फोट घडवला होता. पण भाजपच्या नेतृत्त्वाने अडवाणींची मनधरणी करून त्यांना परत आणले. आता मात्र अडवाणींची नाराजी जग जाहीर झालीय. त्यामुळे अडवाणी काय निर्णय घेतात हे येणारा काळच सांगेन.

 

Loading...

अडवाणींचं पत्र

प्रिय राजनाथ सिंहजी,

"आज दुपारी जेव्हा तुम्ही मला संसदीय मंडळाच्या बैठकीबाबत माहिती दिली तेव्हा मी तुम्हाला माझ्या मनातली व्यथा आणि तुमच्या कामाच्या पद्धतीबाबतची माझ्या नाराजीविषयी बोललो होतो. मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की बैठकीला येऊन सगळ्या सदस्यांसमोर आपलं म्हणणं मांडायचं की नाही, यावर मी विचार करेन. आता मी निर्णय घेतलाय की या बैठकीला न येणंच योग्य आहे."

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2013 09:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close