दिल्ली गँगरेप प्रकरणातील दोषींना आज शिक्षा

दिल्ली गँगरेप प्रकरणातील दोषींना आज शिक्षा

  • Share this:

delhi gang rape new ok13 सप्टेंबर : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. मुकेश, विनय, अक्षय आणि पवन या चारही नराधमांना काय शिक्षा होते, त्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

गेल्या वर्षाअखेरीस 16 डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत धावत्या बसमध्ये सहा जणांनी 23 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता, तसंच तिला आणि तिच्या मित्राला अमानुष मारहाण केली होती. या मुलीचा 11 दिवसांनंतर मृत्यू झाला.

सहांपैकी एका आरोपी रामलालनं तिहार तुरुंगात आत्महत्या केली, तर एकजण अल्पवयीन सिद्ध झाला. चारही आरोपींवर बलात्कार, खून, लूटमार, अनैसर्गिक गुन्हा असे एकूण 13 आरोप सिद्ध झालेत. या चारही नराधमांना फाशीचीच शिक्षा सुनावली पाहिजे अशी मागणी तिच्या आईवडिलांनी केली आहे.

First published: September 13, 2013, 12:19 PM IST

ताज्या बातम्या