S M L

दिल्ली गँगरेप प्रकरणातील चारही दोषींना फाशी

Sachin Salve | Updated On: Sep 13, 2013 06:16 PM IST

दिल्ली गँगरेप प्रकरणातील चारही दोषींना फाशी

13 सप्टेंबर : संपूर्ण देशाला हादरावून सोडणार्‍या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज साकेत कोर्टाने दुर्मिळातील दुर्मिळ घटना नमूद करत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलंय.

 

या प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. दोषी आरोपी मुकेश, विनय, अक्षय आणि पवन या चारही नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या चारही दोषींवर बलात्कार, खून, लूटमार, अनैसर्गिक गुन्हा असे एकूण 13 आरोपांसाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

या निर्णयावर 'निर्भया'च्या कुटुंबीयांनी आम्हाला न्याय मिळाला असून आम्ही सर्व देशवासीयांचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया दिली. तर आरोपींच्या वकिलांनी हायकोर्टात जाणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. 9 महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागल्यामुळे हा खटला न्यायालयीन प्रक्रियेत एक मैलाचा दगड ठरलाय.

 

Loading...
Loading...

मागिल वर्षी 16 डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत धावत्या बसमध्ये सहा जणांनी 23 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता, तसंच तिला आणि तिच्या मित्राला अमानुष मारहाण केली होती. या मुलीचा 11 दिवसांनंतर मृत्यू झाला. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. 'निर्भया', 'दामिनी'ला न्याय मिळावा यासाठी हजारो तरूण रस्त्यावर उतरले होते. दिल्लीत सलग आठवडाभर तरूणाईने आंदोलनं केली होती अखेर त्यांच्या आंदोलनाला आज यश आलंय चारही नराधमांना फासावर लटकवले जाणार आहे. या प्रकरणातील सहांपैकी एका आरोपी रामलालनं तिहार तुरुंगात आत्महत्या केली, तर एकजण अल्पवयीन सिद्ध झाला त्याला तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

 

न्यायाधीश म्हणतात,

'महिलांवर अत्याचार वाढलेले असताना अशा क्रूर आणि घृणास्पद गुन्ह्यांकडे कोर्ट दुर्लक्ष करू शकत नाही. ते सहन केलं जाणार नाही. हा गुन्हा अतिशय अपवादात्मक प्रकारात मोडतो. त्यासाठी फाशी हीच शिक्षा योग्य आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2013 06:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close