भटकळच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2013 03:40 PM IST

yasin bhatkal33310 सप्टेंबर : इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासीन भटकळची कोठडी 7 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांच्या कटांचा छडा लावण्यासाठी आणखी 15 दिवसांची गरज असल्याचं स्पष्टीकरण एनआयएने कोर्टात दिलंय.

 

भटकळच्या लॅपटॉपमधून 3 हजार पानांचे ईमेल्स मिळाले आहेत. त्याची उकल करण्यासाठी वेळ हवा असल्याचं एनआयएनं सांगितलंय. दोन आठवड्यांपुर्वी यासीन भटकळला बिहारच्या सीमारेषेवरून अटक करण्यात आली. त्याच्या सोबत आणखी एक खतरनाक दहशतवाद्याला अटक करण्यात आली.

 

या दोघांची चौकशी सुरू असून आजपर्यंत चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. देशभरात आणखी दहशतवादी कारवाया करणार असल्याची माहिती भटकळने दिली. तसंच वाराणसी, हैदराबाद स्फोटात आपला सहभाग असल्याचंही भटकळने कबूल केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2013 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...