झवेरी बाजार बॉम्बस्फोटात चुकीच्या व्यक्तींना अटक केली,भटकळचा दावा

  • Share this:

Image img_232082_bhatkal_240x180.jpg09 सप्टेंबर : मुंबईत 2011 झवेरी बाजारमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटप्रकरणी महाराष्ट्र एटीएसनं ज्या दोघांना अटक केलीय, त्यांनी बॉम्बस्फोट घडवलेच नाही, असा दावा इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी यासीन भटकळनं केलाय. वकास आणि तबरेझ या दोघांनी हे बॉम्बस्फोट घडवल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलंय. तसंच हा वकास पाकिस्तानचा नागरिक असल्याचा खुलासाही त्यानं केलाय.

 

या संदर्भात आयबीएन नेटवर्कच्या हाती एक सीसीटीव्ही फूटेज लागले आहे. या फूटेजमध्ये बॉम्बस्फोट होण्याअगोदर एक व्यक्ती बॅग घेऊन 6 वाजता घटनास्थळी हजर होती. काही वेळानंतर ती व्यक्ती आपल्याकडील बॅग घटनास्थळी ठेवून पळ काढते. त्यानंतर काही मिनिटातच स्फोट झाला.

 

बॅग ठेवणारा हा वकास सारखा दिसणार होता पण तो वकास नव्हता अशी कबुली यासीन भटकळने दिली. त्याच्या सारख्या दिसणार्‍या माणसाला एटीएसने अटक केली असा दावा भटकळने केलाय. भटकळच्या या दाव्यामुळे एटीएसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पण यासीन तपासा कार्यातून लक्ष दूर करण्यासाठी चुकीची विधानं करत आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2013 09:35 PM IST

ताज्या बातम्या