माथेफिरूने 20 मुलांना ठेवलं ओलीस, सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार

माथेफिरूने 20 मुलांना ठेवलं ओलीस, सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार

घटनास्थळावरील पोलिसांचा मोठा ताफा तैनात झाला आहे. मात्र हा माथेफिरू पोलिसांवरच गोळीबार करत आहे.

  • Share this:

फर्रुखाबाद, 30 जानेवारी : उत्तर प्रदेशातील मोहम्मदाबाद येथील कोतवाली इथल्या करतिया गावात सुभाष वथम यांनी वाढदिवसाच्या बहाण्याने परिसरातील मुलांना बोलावून ओलीस ठेवलं. या मुलांना सोडवण्यासाठी घटनास्थळावरील पोलिसांचा मोठा ताफा तैनात झाला आहे. मात्र हा माथेफिरू पोलिसांवरच गोळीबार करत आहे.

ओसीस ठेवण्यात आलेल्या मुलांची संख्या 20 ते 25 असल्याचे सांगितले जाते. माथेफिरूने केलेल्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा मंदबुद्धी असल्याचे सांगितले जाते. सद्यस्थितीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी परिस्थिती हाताळत आहेत.

First published: January 30, 2020, 10:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या