03 मे : देशाच्या अनेक ठिकाणी बुधवारी रात्री अचानक पाऊस झाला आणि त्यात अनेकांचं नुकसान झालं. पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाने प्रचंड थैमान घातलं आहे. आकडेवारीनुसार, दोन्ही भागातील एकूण 79 लोकांचा मृत्यू झाला आहे. या वादळाची तिव्रता पाहता मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सगळ्याची भरपाई देण्याचे आदेश उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
आग्रा विभागात रात्री उशिरा आलेल्या वादळामुळे ग्रामीण भागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे अनेकांचे जीव गेले तर शेतातल्या उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनातर्फे नासधूस झाल्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या वादळाचा सर्वात मोठा प्रभाव खेरगढ, फतेहाबाद, पिनाहट आणि अछनेरा या भागांवर पडला आहे.
राजस्थानमध्ये वादळामुळे तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. राजस्थानमधील भारपूर, धोलपुर, अल्वर आणि झुंझू या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाळवाऱ्यानं थैमान घातलं आहे. शेतात गव्हाच्या कापणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वादळ आणि चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे.