पुढच्या 48 तासात पुन्हा वादळ धडकणार, मृतांची संख्या 107 वर

पुढच्या 48 तासात पुन्हा वादळ धडकणार, मृतांची संख्या 107 वर

उत्तर भारतात आलेल्या वादळामुळं मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 107 वर गेली आहे. तर पुढच्या 48 तासात पुन्हा वादळ धडकणार असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.03 मे: उत्तर भारतात आलेल्या वादळामुळं मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 107 वर गेली आहे. तर पुढच्या 48 तासात पुन्हा वादळ धडकणार असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

बुधवारी रात्रीपासून उत्तरप्रदेश दिल्ली आणि राजस्थानला या वादळाचा तडाखा बसला. प्रचंड वारा, जोरदार पाऊस आणि वीज पडल्यामुळं हे मृत्यू झाले आहेत. सर्वात जास्त फटका उत्तर प्रदेशला बसला आहे. तिथे 64 जणांचा मृत्यू झाला.

त्यात आग्र्यात 36 लोकांचा मृत्यू झाला. तर राजस्थानमध्ये 32 जणांना प्राण गमवावा लागला. उत्तर प्रदेशात 156 गुरं मृत्यूमुखी पडल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं असून राज्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.

 

 

First published: May 3, 2018, 8:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading