BREAKING : अखेर नीरव मोदीच्या विरोधात अटक वॉरंट जारी

BREAKING : अखेर नीरव मोदीच्या विरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी झालं आहे. लंडनच्या कोर्टाने नीरव मोदीच्या विरोधात हा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

लंडन, 18 मार्च  : नीरव मोदीच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी झालं आहे. लंडनच्या कोर्टाने नीरव मोदीच्या विरोधात हा निर्णय घेतला आहे.  पीएनबी घोटाळ्यातला प्रमुख आरोपी असलेला नीरव मोदी लंडनमध्ये फरार झाला होता.

13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये आहे. या ठिकाणी तो अगदी मुक्तपणे फिरत असल्याचा एक व्हिडिओ 'द टेलिग्राफ' या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केला होता. तसंच नीरव मोदीला आम्ही शोधलं असून तो 'वेस्ट एन्ड लंडन'मध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचा दावा टेलिग्राफनं केला होता.

भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती. मात्र, नीरव मोदीला भारतात परत आणण्यात सरकारला अपयश आलं होतं.

VIDEO : फरार नीरव मोदी सापडला, बघा काय म्हणतोय?

First published: March 18, 2019, 8:23 PM IST
Tags: nirav modi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading