खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी

खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी

खडसे यांच्या बदनामी प्रकरणी तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी दमानियांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे.

  • Share this:

जळगाव,13 एप्रिल :  माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह भाजप पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात वारंवार गैरहजर राहत असलेल्या आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर न्यायालयाने शुक्रवारी अटक वॉरंट जारी केलंय.

खडसे यांच्या बदनामी प्रकरणी तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी दमानियांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात पुन्हा दमानिया गैरहजर राहिल्याने पाटील यांचे वकील अ‍ॅड.चंद्रजीत पाटील, अ‍ॅड.तुषार माळी यांनी न्या.मालवीय यांच्याकडे अटक वॉरंट बजावण्यासंदर्भात अर्ज सादर केल्यानंतर दमानिया यांना अटक करण्यासंदर्भात वॉरंट काढण्यात आले.

यापूर्वीदेखील दमानियांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले होते मात्र दमानिया यांच्या प्रकृती अस्वास्थासह त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्या न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याची बाजू मांडल्यानंतर हे अटक वॉरंट मागे घेण्यात आले होते.

First published: April 13, 2018, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading