'हिंदू पाकिस्तान' शब्दामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!

काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor)यांच्या विरुद्ध कोलकातामधील एका महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाने अटक वॉरंट जारी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 05:32 PM IST

'हिंदू पाकिस्तान' शब्दामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!

कोलकाता, 13 ऑगस्ट: काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor)यांच्या विरुद्ध कोलकातामधील एका महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाने अटक वॉरंट जारी केला आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) थरूर यांनी हिंदू पाकिस्तान हा शब्द वापरला होता. या वादग्रस्त व्यक्तव्यावर कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. कोलकातामधील महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाने वकील सुमित चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा अटक वॉरंट जारी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिरुवनंतपूरम (Thiruvananthapuram) येथे 11 जुलै 2018 रोजी एका कार्यक्रमात थरूर म्हणाले होते की, जर 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर भारतात हिंदू पाकिस्तान होण्याची चिन्ह निर्माण होऊ शकते. भाजप एक नवं संविधान लिहीत आहे. ज्यामुळे भारताचा पाकिस्तान सारखा देश होण्याचा मार्ग मोकळा होईल. अशा हिंदू पाकिस्तानात अल्पसंख्यांकांच्या अधिकारावर गदा येईल आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा सन्मान मिळणार नाही.

भाजपने लिहलेल्या नव्या संविधान हिंदू राष्ट्र सिद्धांतावर असेल. ज्यात अल्पसंख्यांकाचे समानतेचे अधिकार नष्ट होतील आणि देश एक हिंदू पाकिस्तान होईल. महात्मा गांधी, नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आणि स्वातंत्र्य लढ्यातील अन्य नेत्यांनी देशासाठी लढाई लढली नव्हती, असे सांगितले जाईल.

थरूर यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. तेव्हा भाजपने काँग्रेसवर देशातील हिंदूंना बदनाम करण्याचा आरोप केला होता.

Loading...

VIDEO : कोल्हापुरातील ही गावं 'माळीण'च्या उंबरठ्यावर, डोंगरला पडल्या भेगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 05:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...