उन्नाव प्रकरणी भाजप आमदाराची चौकशी पुरे; आता अटक करा -अलाहबाद हायकोर्ट

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2018 05:08 PM IST

उन्नाव प्रकरणी भाजप आमदाराची चौकशी पुरे; आता अटक करा -अलाहबाद हायकोर्ट

 13 एप्रिल: सगळे पुरावे असताना अजूनही उन्नाव बलात्कार प्रकरणी  भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगरला अटक झालेली नाही. यावरून अलाहबाद हायकोर्टाने आज  पोलिसांना  आणि सीबीआयला खडे बोल सुनावले आहे. सगळे पुरावे असतानाही आमदाराला अटक का झाली नाहीये असं विचारत आता चौकशी पुरे झाली अटक करा  असे आदेश हायकोर्टाने दिली आहे.

उन्नाव येथे  मागच्या वर्षी   जुन एका महिलेवर  बलात्कार करण्यात आला होता. हा बलात्कार  भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेनगर  केल्याचा आरोप   पीडितेने केला आहे. 20 जूनला तक्रार दाखल झाली तरी काही कारवाई झाली नाही.सगळे प्रयत्न करून झाल्यावर अखेर महिलेने आपल्या कुटुंबासह  योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. हे सगळं प्रकरण आता हायकोर्टाने सीबीआयच्या हाती दिलं आहे.यावरच सुनावणी करताना अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी हायकोर्टाने  सांगितल्या आहेत. गेल्या शुक्रवारी आमदाराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं .पण आठवडाभर अटक झालीच नाही.  तेव्हा आता त्याची चौकशी पुरे करा आणि अटक करा असं सांगण्यात आलंय. तसंच आतापर्यंत तपास मोहीम कुठवर आली याचा अहवालही  कोर्टाने मागवला आहे.

आता याप्रकरणी पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close