काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बंद पाडली 50 हजार मंदिरं, आता मोदी सरकार उघडणार दारं!

मंदिरांसोबतच अनेक सरकारी शाळाही बंद पाडण्यात आल्यात. त्या शांळांचा सर्व्हेही करण्यात येणार असून त्या शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 04:15 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बंद पाडली 50 हजार मंदिरं, आता मोदी सरकार उघडणार दारं!

नवी दिल्ली 23 सप्टेंबर : जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर केंद्र सरकार आणखी आक्रमक पावलं टाकत आहे. त्यासाठी सरकारने एक योजनाही तयार केलीय. केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी याचे आज संकेत दिलेत. गेल्या तीन दशकात दहशतवाद्यांनी जो धुमाकूळ घातला होता त्यामुळे राज्यातली तब्बल 50 हजार मंदिरं बंद पाडण्यात आली होती. या मंदिराचा सर्व्हे मोदी सरकार करणार असून त्या मंदिराची दारं पुन्हा उघडण्यात येणार असल्याची ग्वाहीही रेड्डी यांनी दिली. त्यासाठी केंद्र सरकार खास उपायोजना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

रेड्डी म्हणाले, काश्मीरमधून हजारो काश्मिरी पंडितांना घाटीच्या बाहेर हाकलण्यात आलंय. त्यांना राज्यातून पलायन करावं लागलं. त्यांचा नरसंहार करण्याचा प्रयत्न झाला. त्या काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा त्यांच्या मुळ गावांमध्ये वसवायचं आहे. त्या काळात अनेक मंदिरांची तोडफोड करण्यात आली, मूर्ती तोडण्यात आल्या, त्या सगळ्यांची पुर्नस्थापना करायची आहे असंही ते म्हणाले.

वाचा - शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही, राष्ट्रवादीचा पलटवार

मंदिरांसोबतच अनेक सरकारी शाळाही बंद पाडण्यात आल्यात. त्या शांळांचा सर्व्हेही करण्यात येणार असून त्या शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. अशा बंद पडलेल्या शाळांमध्ये मुलांची पुन्हा लगबग लवकरच बघायला मिळेल असा दावा त्यांनी केला. काश्मीर खोऱ्यातून व्देषाचं राजकारण समूळ नष्ट करायचं आहे असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, दहशतवादाला नष्ट करण्यासाठी सरकारने तीन स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. त्या उपाययोजना कठोरपणे अंमलात येणार असून सरकार दहशतवादाविरुद्ध कडक पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loading...

वाचा - ...तर आम्ही बालाकोटच्या पुढे जाऊ; लष्कर प्रमुखांचा पकिस्तानला निर्वाणीचा इशारा

1980 आणि 90 च्या दशकात खोऱ्यात दहशतवादाने धुमाकूळ घातलेला असताना दहशतवादाने मोठी उचल खाल्ली होती. काश्मिरी पंडितांवर हल्ले करण्यात आले होते. त्याकाळात काश्मिरी पंडितांनी देशभर आश्रय घेतला होता. त्यांना निर्वासित छावण्यांमध्ये राहावं लागलं होतं. तेव्हापासून त्यांचं पुर्नवसन करण्याची मागणी होतेय. आपल्याच देशात निर्वासित म्हणून राहण्याची एखाद्या समुदायाची ही पहिलीच वेळ असल्याची खंतही या पडिंतांनी व्यक्त केली होती. पंडितांना खोऱ्यात नेण्याचे अनेक प्रयत्नही झाले मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे ते शक्य झालं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: kashmir
First Published: Sep 23, 2019 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...