चेन्नई, 14 फेब्रुवारी - तामिळनाडूच्या कोईमतूर जिल्ह्यातील सुमारे 400 दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे, असा दावा तामिळ पुलीगल कच्छी या दलित संघटनेनं केला आहे. 5 जानेवारीपासून सुमारे 40 कुटुंबांचे धर्मांतर झाले असून ही प्रक्रिया अद्याप सुरू आहे, असा दावा या संस्थेनं म्हटलं आहे.
2 डिसेंबर रोजी मेट्टुपलायममध्ये भिंत कोसळल्याच्या घटनेचा संदर्भ दिला. तामिळ पुलीगल कच्छीचे राज्य सचिव इलावेनिल म्हणाले की, मेट्टूपलायममधील 17 लोकांचा मृत्यू हे धर्मांतराचं कारण आहे. तर या लोकांना धर्म आवडतो आहे आणि नियमितपणे ते नमाजही पढतात असा दावा इलावेनिल यांनी केला आहे.
अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर दलितांचं इस्लाम धर्मात रुपांतर होण्याचं कारण म्हणजे भिंत कोसळण्याच्या घटनेला त्यांचा जबाबदार धरण्यात आलं आहे. या भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भिंतीला जातीचं भिंत असं संबोधलं जात आहे. यामुळे दलित समाज आणि इतर समाजामध्ये अडथळा निर्माण झाला. दलित बांधवांनी असा दावा केला आहे की ही भिंत त्यांच्या समाजातील लोकांना संपवण्यासाठीच बांधली गेली होती.
महाराष्ट्राच्या तरुणाने पुलवामाच्या शहिदांची जपली शेवटची आठवण, दिली श्रद्धांजली
एवढ्या मोठ्या प्रमाणावर जरी हे धर्मांत झालं असलं तरी हे धर्मांतर स्वेच्छेनं झालं आहे. कुणाच्याही दबावाखाली हे झालं नसल्याचा दावा तामिळ पुलीगल कच्ची या संघटनेनं केलाय.तर मागील तीन वर्षांपासून मला इस्लाम धर्माची प्रेरणा मिळाली आणि मी त्याच्या धार्मिक कायद्यांमुळे, शिक्षणामुळे धर्मांतर करण्याचं ठरवलं. हा निर्णय कुणाच्याही प्रभावाखाली घेण्यात आला नाही अशी माहिती धर्मांतर केलेल्या दलित बांधवांनी नेटवर्क 18च्या प्रतिनिधींना सांगितलं.
'काश्मीर पाकच्या हृदयात आहे तेवढं आमच्याही,'या नेत्याचा इम्रान खान यांना पाठिंबा