जवानांना शस्त्र वेळेवर मिळत नाहीत, लष्कराच्या रिपोर्टमुळे खळबळ!

जवानांना शस्त्र वेळेवर मिळत नाहीत, लष्कराच्या रिपोर्टमुळे खळबळ!

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराने त्यांना मिळणाऱ्या शस्त्रांची गुणवत्ता आणि ते मिळण्यास लागणाऱ्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे: देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराने त्यांना मिळणाऱ्या शस्त्रांची गुणवत्ता आणि ते मिळण्यास लागणाऱ्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ऑर्डिनस फॅक्ट्री बोर्ड (OFB)कडून मिळणारे 21 हजार 500 कोटी रुपयांचे शस्त्रे आणि काडतुसे गेल्या 10 वर्षात सातत्याने उशिरा मिळत आहेत. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाला 15 पानांचा एक रिपोर्ट देखील सादर केला आहे.

काय आहे हे प्रकरण

टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय लष्कर आणि OFB या दोन्ही विभागांनी शस्त्र पुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे. शस्त्रे खरेदी करण्याची पहिली योजना 20089-14मध्ये पूर्ण होणार होती. 14 हजार कोटी रुपयांचे शस्र पुरवठा वेळेवर मिळाला नव्हता. त्यानंतरची दुसरी योजना 2014-19 या काळातील होती. या काळात 7 हजार 500 कोटी रुपयांचा शस्त्र पुरवठा होणार होता. पण अद्याप त्याबद्दल काहीच प्रक्रिया पूर्ण झाली नाही. शस्त्रे आणि काडतुसे यांच्यासाठी भारतीय लष्कर मोठ्या प्रमाणात OFB अवलंबून आहे. इतक नव्हे तर लष्कराच्या शस्र पुरवठ्याचा मुख्य स्रोत OFBच आहे. भारतीय लष्करातील भूदल आणि हवाई दल यांना लागणारा दारूगोळा OFBकडून दिला जातो. या सरकारी कंपनीची वर्षाची उलाढाल 19 हजार कोटी इतकी आहे. पण लष्कराने या शस्रे आणि दारूगोळ्याची गुणवत्ता चांगली नसल्याचे म्हटले आहे.

शस्रांच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह

लष्कराला मिळणाऱ्या शस्रांच्या गुणवत्तेवर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. गुणवत्ता नसलेल्या दारूगोळ्यांच्या वापरामुळे जवानांचा मृत्यू होणे आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढल्याची तक्रार देखील भारतीय लष्कराने केली आहे. महाग अशा शस्रांचे खराब होण्याचे प्रमाण वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लष्कराने दिलेल्या या रिपोर्टमुळे संरक्षण मंत्रालयाच्या शस्र पुरवठा विभागात खळबळ उडाल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

उरी येथे भारतीय लष्करावर झालेल्या हल्ल्यानंतर सरकारला मोठा झटका बसला होता. उरी येथे झालेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडे पुरेशी शस्रे नसल्याचे तेव्हा समोर आले होते. त्यानंतर 11,740 कोटी रुपयांचे 19 करार करण्यात आले होते. यात रशियाकडून स्मार्क रॉकेट, टॅक कायडेड मियाईल, टी90 आणि टी72 टॅक आदी शस्रांचा समावेश होतो.

SPECIAL REPORT: 'हे राम'चं राजकारण हिट होईल?

First published: May 15, 2019, 9:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading