पुलमावामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 5 जवान जखमी

जम्मू आणि काश्मीरच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशतवादी मोठा हल्ला घडवून आणू शकतात अशी माहिती भारताला पाकिस्ताननेच दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 07:41 PM IST

पुलमावामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 5 जवान जखमी

श्रीनगर,17 जून :  पुलवामा इथं दहशतवाद्यांनी आज पुन्हा एकदा लष्कारच्या ताफ्यावर IED स्फोट करत हल्ला केला. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले आहेत. लष्कराचं वाहन पूर्ण उध्वस्त झालं असून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यात एक दहशतवादी ठार झाला. दहशतवादी मोठा हल्ला घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांना मिळाली होती.

पुलवामा इथल्या ईदगाह अरिहल भागात हा हल्ला झाला. 44 राजपूताना रायफल चं पथक पेट्रोलिंगवर असतानाच हा हल्ला झाला. सावध असलेल्या जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. जम्मू आणि काश्मीरच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशतवादी मोठा हल्ला घडवून आणू शकतात अशी माहिती भारताला पाकिस्ताननेच दिली होती. त्यानंतर अमेरिकेनेही अशी माहिती दिली होती. त्यामुळे सुरक्षा दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय.

14 जूनलाही झाली होती चकमक

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. अवंतीपोरा परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना शुक्रवारी (14 जून) मिळाली होती. यानंतर जवानांनी चहुबाजूंनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली.यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, घरच स्फोटकांनी उडवलं. ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेची संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. 'News18 India' नं दिलेल्या वृत्तानुसार, ठार मारण्यात आलेला एक अतिरेकी गुरुवारीच (13 जून) दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...