Home /News /national /

त्या गोळीबार प्रकरणी लष्करानं दिलं स्पष्टीकरण, निवेदन जारी करत सांगितलं कारण

त्या गोळीबार प्रकरणी लष्करानं दिलं स्पष्टीकरण, निवेदन जारी करत सांगितलं कारण

नागालँडमधील मोन जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारात (Nagaland Firing) एका जवानासह 15 जणांचा मृत्यू (15 deaths) झाला आहे.

    मोन, 06 डिसेंबर: नागालँडमधील मोन जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारात (Nagaland Firing) एका जवानासह 15 जणांचा मृत्यू (15 deaths) झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला आहे. या प्रकरणी आता लष्कराकडून एक निवेदन (Indian army statement) जारी करण्यात आलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, जवानांनी स्व-संरक्षणासाठी हा गोळीबार केला. या दुर्दैवी घटनेत लष्कराचे दोन जवान देखील जखमी (injured) झाले आहेत. नागालँड गोळीबार प्रकरणी जारी केलेल्या निवेदनात लष्करानं पुढे म्हटलं की, शनिवारी दुपारी 4 च्या सुमारास जवळपास 500 तरुणांचा संतप्त जमाव नागालँडमधील मोन येथील सुरक्षा दलाच्या छावणीत घुसला होता. आदल्या दिवशी तिजितच्या तिरूमध्ये लोकांच्या झालेल्या लोकांच्या हत्याकांडच्या पार्श्वभूमीवर तरुणांकडून निदर्शनं करण्यात येत होती. सुरक्षा दलांनी संतप्त झालेल्या जमावाची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र जमावाने छावणीची तोडफोड सुरू केली. हेही वाचा-भारत-पाकिस्तान सीमेवर महिलेची प्रसूती; बाळाला दिलं खास नाव जमावाने तोडफोड केल्यानंतरही सुरक्षा दलानं संयम राखला, असं लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. तसेच संतप्त जमावाला शांत राहण्याचं आवाहन करत परत जाण्यास सांगितलं जात होतं. सुरक्षा दलाकडून सातत्याने जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संतप्त झालेल्या जमावाने लष्कराच्या वाहनाची तोडफोड करून वाहनाला आगीच्या हवाली केलं. हेही वाचा-मुंबई हादरली! फोन करून पत्नीला ऐकवला शेवटचा आवाज मग लेकीसोबत केलं राक्षसी कृत्य तरीही सैनिकांनी बळाचा वापर केला नाही. जमावाने सैनिकांवर सशस्त्र हल्ला करण्यास सुरू केल्यानंतर जवानांनी देखील स्वसंरक्षणासाठी जमावावर गोळीबार केल्याचं निवेदनात म्हटलं आहे. या गोळीबारात काही नागरिक जखमी झाले. यामध्ये दोन सुरक्षा दलाचे जवान देखील गंभीर जखमी झाल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या