लष्करासाठी नवं बुलेटप्रूफ हेल्मेट

लष्करासाठी नवं बुलेटप्रूफ हेल्मेट

संरक्षण मंत्रालयासोबत झालेल्या १८० कोटी रुपयांच्या या करारानुसार कंपनी सैन्याला १ लाख ६० हजार बुलेटप्रूफ हेल्मेट देणार आहे.

  • Share this:

28 जून : लष्करी कारवायांमध्ये धाडसाने शत्रूंना सामोरे जाणाऱ्या सैन्याच्या जवानांना केंद्र सरकारने सुरक्षा कवच दिलं आहे. सैन्याच्या जवानांसाठी केंद्र सरकारने नवीन बुलेटप्रुफ हेल्मेट घेतलं असून गेल्या दशकभरापासून जवानांसाठी बुलेटप्रूफ हेल्मेटची मागणी केली जात होती.

भारतीय सैन्यातील जवान सध्या जुन्या काळातील हेल्मेट वापरत होते. पण हे हेल्मेट शत्रूंच्या गोळीपासून संरक्षण करण्यासाठी सक्षम नव्हते. या हेल्मेटचं वजन सुमारे अडीच किलो होतं. याशिवाय यात जवानाचं डोकं पूर्णपणे सुरक्षित राहील याची खात्रीही नव्हती. यात डोक्याच्या मागच्या बाजूचं संरक्षण होत नव्हतं.

सैन्याच्या जवानांना लष्करी कारवायांदरम्यान आधुनिक हेल्मेट द्यावं अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. शेवटी केंद्र सरकारने वर्षाच्या सुरुवातीला कानपूरमधील एमकेयू लिमिटेड या कंपनीला बुलेटप्रूफ हेल्मेटचे कंत्राट दिलं होतं. यूके आणि नाटोच्या सैन्यालाही याच कंपनीने हेल्मेट पुरवले होते.

संरक्षण मंत्रालयासोबत झालेल्या १८० कोटी रुपयांच्या या करारानुसार कंपनी सैन्याला १ लाख ६० हजार बुलेटप्रूफ हेल्मेट देणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील हेल्मेट सैन्याकडे सुपूर्त करण्यात आलं. जागतिक पातळीवरील निकषाचे या हेल्मेटमध्ये पालन करण्यात आलं आहे. या हेल्मेटमध्ये कम्युनिकेश डिव्हाईस आणि नाईट व्हिजन डिव्हाईसही लावणे शक्य होणार आहे. भारतासह जर्मनीत चाचणी केल्यानंतरच हे हेल्मेट ग्राहकांना दिले जातात असं कंपनीचं म्हणणं आहे. सैन्याला दिलेले हेल्मेट ९ मिलीमीटर गोळीचा मारा सहन करू शकतील असं कंपनीने म्हटलं आहे.

First published: June 28, 2017, 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading