PULWMA : अतिरेक्यांनी सैनिकाला घराजवळच घातल्या गोळ्या; पुलवामामधील धक्कादायक प्रकार

PULWMA : अतिरेक्यांनी सैनिकाला घराजवळच घातल्या गोळ्या; पुलवामामधील धक्कादायक प्रकार

दक्षिण काश्मीरमध्ये एका 25 वर्षीय सैनिकाला त्याच्या घराजवळच गोळ्या घालून ठार करण्याची भयंकर घटना समोर आली आहे. पुन्हा एकदा पुलवामा जिल्ह्यातच ही घटना घडली.

  • Share this:

श्रीनगर, 13 मार्च : काश्मीर खोऱ्यातला हिंसाचार अजून थांबलेला नाही. दक्षिण काश्मीरमध्ये एका 25 वर्षीय सैनिकाला त्याच्या घराजवळच गोळ्या घालून ठार करण्याची भयंकर घटना समोर आली आहे. पुन्हा एकदा पुलवामा जिल्ह्यातच ही घटना घडली असल्याची बातमी ग्लोबल न्यूज सर्व्हिसेसने दिली आहे.

जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री रेजिमेंटचा जवान आशिक हुसेन याला काही संशयित अतिरेक्यांनी मारलं. हल्लेखोर तोंडावर रुमाल बांधून आल्याने ओळख पटलेली नाही. पुलवामा जिल्ह्यात पिंगलीना गावाच्या नाईक दक्षिण काश्मीरमध्ये एका 25 वर्षीय सैनिकाला त्याच्या घराजवळच गोळ्या घालून ठार करण्याची भयंकर घटना समोर आली आहे. मोहल्ल्यात हा प्रकार घडला. जवानाच्या घराबाहेरच हल्लेखोरांनी त्याला मारलं.

पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. आशिक हुसेन यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकारानंतर लष्कर आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रूपची संयुक्त टीम या भागात तपास करत आहे. पुलवामामध्ये गेल्याच महिन्यात CFPF च्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झआले होते.

त्यानंतर भारताने खोऱ्यातील दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने मोठी पावलं उचलली. सीमेपार केलेल्या एअर स्ट्राईकनंतर खोऱ्यातल्या दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली. पण तरीही दहशतवादी आणि फुटीरवाद्यांचे उद्योग सुरूच आहेत.

VIDEO: भीषण अपघात ! डिव्हायडरला धडकून कार हवेत उडाली, अन्...

First published: March 13, 2019, 5:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading