S M L

आर्मी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणात मीरतमध्ये मेजरला अटक

देशाची राजधानी दिल्लीतील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कँट परिसरात सेना अधिकाऱ्याची पत्नी शैलजा द्विवेदी हत्या प्रकरणात पोलिसांनी सेनेचे एक मेजर निखिल हांडाला मीरतमधून अटक केली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 25, 2018 04:06 PM IST

आर्मी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणात मीरतमध्ये मेजरला अटक

नवी दिल्ली, 25 जून : देशाची राजधानी दिल्लीतील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कँट परिसरात सेना अधिकाऱ्याची पत्नी शैलजा द्विवेदी हत्या प्रकरणात पोलिसांनी सेनेचे एक मेजर निखिल हांडाला मीरतमधून अटक केली आहे. शनिवारी कँट परिसरातील बरार चौकात एका महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा होती.

शनिवारी सकाळी 10वाजता शैलजा फिजिओथेरपीसाठी आर्मी हॉस्पिटलला गेली होती. काही वेळानंतर जेव्हा ड्रायव्हर त्यांना परत घेण्यासाठी आला तेव्हा त्याला कळले की त्या फिजिओथेरपीसाठी आलीच नाही. सायंकाळी 4 वाजेपर्यंत जेव्हा पत्नी घरी परतलेली नाही कळल्यावर तिच्या कर्नल पतीने पोलिसात बायको हरवल्याची तक्रार दिली.

पोलिसांनी सांगितले की रस्ता अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची सूचना मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यावर निरीक्षणानंतर लक्षात आले की हा अपघात नसून महिलेचा गळा कापून हत्या करण्यात आली आहे. तिचे कपडे वाईट पद्धतीने फाटले होते. पोलीस तपासात उघड झाले की हत्येनंतर तिच्या मृतदेहावरून गाडीही चालवली गेली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस तपासात कळलं की मेजरच्या पत्नीच्या दुसऱ्या मेजरसोबत अनैतिक  प्रेमसंबंध होते. महिलेच्या मोबाइलमधील कॉललॉग तपासले असता शेवटचा कॉल निखिल हांडाला केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासात संशयाची दिशा हांडाकडे वळवली. म्हणूनच त्यांनी  हांडाला अटकही केली. या आधी हांडा आणि शैलजाचे पती द्विवेदी दिमापूर येथे सोबतच सेनेत काम करत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 04:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close