पाकिस्तानी उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश

पाकिस्तानी उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश

शहीद जवान विटंबना आणि शस्त्रसंधी उल्लंघनाच्या मुद्यावरून भारत सरकारने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याकडे खुलासा मागितलाय. त्

  • Share this:

03 मे : शहीद जवान विटंबना आणि शस्त्रसंधी उल्लंघनाच्या मुद्यावरून भारत सरकारने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याकडे खुलासा मागितलाय. त्यांना याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने हजर होण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

आज सकाळी यासंबंधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एक तातडीची बैठक बोलावली होती. त्यानंतर पाकच्या उच्चायुक्तांना पाचारण करण्यात आलंय. दरम्यान आज पाकिस्तानने सीमा भागात पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.

जवानांच्या पर्थिवाची विटंबना केल्या प्रकरणी पराराष्ट्र मंत्रालयाचे सचिव यांनी पाकिस्तान उच्चायुक्त यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. ज्या पाकिस्तानी अधिकारी आणि सैनिकांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कडक कारवाई करण्याती केली मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 04:09 PM IST

ताज्या बातम्या