श्रीनगर, 08 मार्च : जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कराच्या एका जवानाचं अपहरण करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भारतीय लष्कराचे जवान मोहम्मद यासीन भट यांना काजीपोरा चादुरामध्ये असलेल्या त्यांच्या घरातून काही दहशतवाद्यांनी किडनॅप केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
फेब्रुवारी 26 ते मार्च 31 पर्यंत मोहम्मद हे सुट्टीवर गेले होते. त्यावेळी त्यांचं चक्क घरातून अपहरण करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कर आणि पोलीस मोहम्मद यांच्या घरी दाखल झाले आहेत. तर याचा आता अधिक तपास करण्यात येत आहे.
#JammuAndKashmir: An army Jawan of (JAKLI Unit) Mohammad Yaseen reportedly kidnapped by terrorists from his residence in Qazipora Chadoora in Budgam, today late evening. More details awaited. pic.twitter.com/oHhhG2wXlz
राजस्थानच्या बिकानेरमध्ये दुपारच्या सुमारास मिग-21 बायसन विमान कोसळलं. सुदैवानं या अपघातातून वैमानिक बचावला आहे. नेहमीच्या सरावासाठी हे विमान उडालं. मात्र तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही वेळातच विमान कोसळलं. दरम्यान या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश सरंक्षण दलानं दिले आहेत. मागच्या आठवड्यात भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पाडताना भारताचं मिग-21 बायसन पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं होतं.
भारत-चीन युद्धानंतर मिग-२१ विमानांचा भारतीय वायुदलात समावेश करण्यात आला. २००६ मध्ये या विमानांमध्ये सुधारणा करुन त्यांची क्षमता वाढवण्यात आली. आर-७३ मिसाइल बसवल्यानंतर या विमानांच्या एअर टू एअर लढाईच्या क्षमतेमध्ये मोठी सुधारणा झाली. मागच्या आठवडयात पाकिस्तानी फायटर विमानांबरोबरच्या डॉगफाइटमध्ये अभिनंदन वर्थमान यांनी एफ-१६ वर आर-७३ मिसाइल डागले होते.
बिकानेर येथील शोभासर येथे भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान कोसळले. बिकानेर येथील नाल विमानतळाजवळ लढाऊ विमान कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावरून एक मोठा आवाज आला आणि धुर आल्याचे लोकांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेतली आहे.
याआधी 12 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधीलच जैसलमेर येथे पोखरण परिसरात मिग-27 विमान कोसळले होते. तेव्हा वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडला होता. मिग-27 हे रशियन बनावटीचे विमान आहे. भारताने 1980 च्या दशकामध्ये या विमानाची खेरदी केली होती. 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी याचा चांगला उपयोग झाला होता. या लढाऊ विमानाने पर्वतावर असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला केला होता.
VIDEO: क्लासमध्ये विद्यार्थीनीची काढली छेड; शिक्षकाला असा दिला चपला, बुटांचा आहेर