भारतीय लष्काराला मोठं यश! काश्मीरमधून 'लष्कर-ए-तोयबा' 8 दहशतवाद्यांना अटक

उत्तर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांना 'लष्कर-ए-तोयबा'चं टेरर मॉड्युल पकडण्यात यश आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 08:53 AM IST

भारतीय लष्काराला मोठं यश! काश्मीरमधून 'लष्कर-ए-तोयबा' 8 दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर, 10 सप्टेंबर : भारतीय लष्कराला काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत मोठं यश मिळालं आहे. उत्तर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांना 'लष्कर-ए-तोयबा'चं टेरर मॉड्युल पकडण्यात यश आलं आहे. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनंतर, जवान आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध अभियान राबवलं. या कारवाईदरम्यान 'लष्कर-ए-तोयबा' संबंधित असलेल्या एकूण 8 दहशतवाद्यांना सोपोरमधून अटक करण्यात आली. सध्या या दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्लातील सोपोरमध्ये 'लष्कर-ए-तोयबा'साठी काम करणाऱ्या काही लोकांची माहिती गुप्तचर संस्थांच्या हाती लागली होती. ही माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवान आणि पोलिसांनी तातडीनं संयुक्त कारवाई राबवत परिसरात शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत आठ संशयित दहशतवाद्यांना अटक केली.

(वाचा : Alert : आता दक्षिणेतून होऊ शकतो दहशतवादी हल्ला, लष्कराला मिळाली ही गुप्त माहिती)

(वाचा : VIDEO : पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने घुसखोरी करत होते अतिरेकी)

अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांचा बारामुल्लातील दुकानदारांना बाजार बंद ठेवण्यासाठी धमकी देणं आणि वादग्रस्त पोस्टर्स लावण्याच्या घटनांमध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

(वाचा : धक्कादायक! Rapistan चा अर्थ Urban Disctionary मध्ये काय दिलाय पाहा!)

अटक केलेल्या 8 दहशतवाद्यांची नावं

1. एजाझ मिर

2. ओमर मिर

3. तौसीफ नाझर

4. इम्तियाझ नाझर

5. ओमर अकबर

6. फैजान लतीफ

7. दानिश हबीब

8. शौकत अहमद मिर

VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 08:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...