पुलवामात चकमकीत लष्कराने केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामात चकमकीत लष्कराने केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा

त्या माहितीनुसार लष्कराचं शोधकार्य सुरू होतं. या शोधकार्यातच दहशतवादी आणि भारतीय लष्कराची चकमक झाली. याच चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले तर तारिक अहमद नावाच स्थानिक नागरिक जखमी झाला.

  • Share this:

पुलवामा, 07 नोव्हेंबर: पुलवामात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. तर या चकमकीत श्याम सुंदर नावाचा एक जवानही शहीद झाला आहे.

पुलवामाच्या कंदी भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. त्या माहितीनुसार लष्कराचं शोधकार्य सुरू होतं. या शोधकार्यातच दहशतवादी आणि भारतीय लष्कराची चकमक झाली. याच चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले तर तारिक अहमद नावाच स्थानिक नागरिक जखमी झाला.

आता चकमक आणि गोळीबार थांबला असल्याची माहिती लष्कराने दिली आहे. पण अजूनही लपलेल्या दहशतवाद्यांचं शोधकार्य सुरूच आहे. सीआरपीएफ आणि जम्मू काश्मिर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत - दहशतवाद्यांकडून एके 47 . एम 16 रायफल आणि पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 10:38 AM IST

ताज्या बातम्या