URI मध्ये संशयास्पद हालचाली; भारतीय लष्कराचे सर्च ऑपरेशन

URI मध्ये संशयास्पद हालचाली; भारतीय लष्कराचे सर्च ऑपरेशन

उरीमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता?, भारतीय लष्कराचे सुरु केले सर्च ऑपरेशन...

  • Share this:

उरी, 11 फेब्रुवारी: जम्मू-काश्मीरमधील उरी येथील भारतीय लष्कराच्या कॅम्पजवळ काही संशयास्पद हालचाली दिसल्या आहेत. भारतीय लष्कराने संपूर्ण परिसरात अलर्ट जारी केला असून जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

हे देखील वाचा- URI Movie Review: 'उनको काश्मीर चाहीये और हमे उनका सीर'

सुरक्षेच्या दृष्टीने उरी हा संवेदनशील भाग आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ असलेल्या राजरवानी आर्मी आर्टिलरी युनिट जवळ काही लोकांना पाहण्यात आले. त्यानंतर जवानांनी गोळीबार सुरु केला. पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर लष्कराने वेगाने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. उरी येथील लष्कराच्या कॅम्पवर 2016मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. 18 आणि 19 डिसेंबर रोजी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतली होती. भारतीय जवान झोपेत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

वाचा: भारतीय लष्करानं 'असा' केला दहशतवाद्यांचा खात्मा, हा पहा सर्जिकल स्ट्राइक व्हिडिओ

उरी हल्ल्याच्या 10 दिवसानंतर भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या केंद्रावर सर्जिकल स्टाईक केला होता. याच घटनेवर आधारीत 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यात विक्की कौशल याने मुख्य भूमिका केली आहे.

First published: February 11, 2019, 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading