मराठी बातम्या /बातम्या /देश /

शहीद औरंगजेबच्या हत्या प्रकरणात 3 जवान ताब्यात

शहीद औरंगजेबच्या हत्या प्रकरणात 3 जवान ताब्यात

44 राष्ट्रीय रायफल तुकडीतील जवान औरंगजेबची अपहरण करून हत्या प्रकरणामध्ये तीन जवानांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे तिन्ही जवान 44 राष्ट्रीय रायफल तुकडीतील आहेत.

6 फेब्रुवारी, दिल्ली : 44 राष्ट्रीय रायफल तुकडीतील जवान औरंगजेबचे अपहरण करून हत्या प्रकरणामध्ये तीन जवानांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सैन्यानं या जवानांना ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. हे तिन्ही जवान 44 राष्ट्रीय रायफल तुकडीतील आहेत.

या जवानांनी औरंगजेब संदर्भातील माहिती दहशतवाद्यांना दिली. त्यानंतर औरंगजेबचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. यासंदर्भातील अधिक माहिती चौकशीअंतीच समोर येईल. आबीद वाणी, तज्जमुल अहमद आणि आदिल वाणी अशी या तिघांची नावं आहे.

यातील दोन जवान पुलवामा तर एक जण कुलगामचा रहिवासी आहे. जून 2018 साली औरंगजेब ईदच्या निमित्तानं घरी जात होता. त्यावेळी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी औरंगजेबचं अपहरण करून हत्या केली होती.

14 जून 2018 रोजी औरंगजेबचा मृतदेह सापडला होता. यावेळी दहशतवादी औरंगजेबकडे सैन्याबाबत चौकशी करत असल्याचा व्हिडीओ देखील समोर आला होता.

औरंगजेबच्या हत्येनंतर पेटलं होतं काश्मीर

औरंगजेबची हत्या करण्यात आल्यानंतर काश्मीर खोरं अशांत झालं होतं. दहशतवाद्यांविरोधातील प्रचंड रोष यावेळी दिसून आला होता. यावेळी औरंगजेबच्या वडिलांनी 'माझ्या मुलाच्या हत्येचा बदला घ्याच' असं थेट आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण आणि लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी देखील औरंगजेबच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.दहशतवाद्यांकडून आता जवान आणि पोलीसांना देखील लक्ष्य केलं जात आहे. औरंगजेबनंतर काही पोलिसांवर देखील हल्ले करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत.

शिवाय, पत्रकार सुजात बुखारी यांची देखील दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर रोष काश्मीर खोऱ्यामध्ये पाहायाला मिळत आहे.

Special Report : प्रशांत किशोर ठरणार का युतीचे नवे चाणक्य?

First published:

Tags: Indian army, Soldier aurangzeb abducted and murdered, Terror attack