भारतीय सैन्यात 'गे' नकोत; लष्करप्रमुख म्हणतात, समलैंगिकांना परवानगी नाही

भारतीय सैन्यात 'गे' नकोत; लष्करप्रमुख म्हणतात, समलैंगिकांना परवानगी नाही

भारतीय लष्करात गे व्यक्तींना स्थान नाही, अशा अर्थाचं वक्तव्य लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केलं आहे. 377 कलमात बदल केल्यानंतरही लष्कराचे नियम बदलणार नाहीत, असं ते म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जानेवारी : लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी गुरुवारी (10 जानेवारी)वार्षिक पत्रकार परिषदेत पाकिस्तान, चीन सीमा, दहशतवात, काश्मीर अशा अनेक मुद्द्यांबाबत चर्चा केली. या परिषदेतला एक मुद्दा भारतीय दंडविधान कलम 377 चाही होता.

कलम 377 मध्ये कायदाबदल केल्यानं आता समलैंगिक संबंध ठेवणं कायद्यानं गुन्हा ठरणार नाही. पण लष्करासाठी मात्र या कायदाबदलाने काही फरक पडणार नाही, असं जनरल रावत म्हणाले. 'भारतीय लष्कर कॉन्झर्वेटिव्ह आहे आणि इथे कुणालाच व्यभिचार करण्याची अनुमती नाही', असंही ते म्हणाले.

भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे आणि कुठलंही चिंतेचं कारण नाही, असा दिलासा त्यांनी दिला. जम्मू काश्मीरमध्ये शांती नांदावी यासाठी आम्ही केवळ समन्वयकाची भूमिका बजावत आहोत.

काश्मीरमधल्या परिस्थितीची तुलना तालिबानशी करता येऊ शकत नाही, असं सांगताना जनरल रावत म्हणाले, "राज्यात दहशतवाद्यांच्या नाही, आमच्या अटींबाबतही चर्चा व्हायला हवी."

पाकिस्तानला कडक भाषेत इशारा देताना जनरल रावत म्हणाले, "दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही. म्हणून बंदुका सोडा आणि हिंसा बंद करा."

First published: January 10, 2019, 3:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading