'पाकिस्तान कारगिल सारखं धाडस करण्याची पुन्हा हिंम्मत करणार नाही'

'पाकिस्तान कारगिल सारखं धाडस करण्याची पुन्हा हिंम्मत करणार नाही'

'आगावूपणा केला तर काय होतं याचा धडा पाकिस्तानला मिळाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा अशी मुजोरी करणार नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 5 जुलै : भारत आता खूप बदललाय, पाकिस्तानने 1999मध्ये कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचं जे धाडस केलं. आता पुन्हा ते धाडस करण्याची हिंम्मत पाकिस्तान करणार नाही असं मत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केलंय. याचं कारण म्हणजे असं केलं तर काय होतं याचा धडा पाकिस्तानला मिळाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा अशी मुजोरी करणार नाही असंही ते म्हणाले.

'ऑपरेशन विजय'ला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रावत म्हणाले, आता भारताची दक्षता कमालीची वाढलीय. सीमेवरच्या प्रत्येक भागावर आमची नजर असते. भारताची शस्त्र सज्जताही वाढली आहे. असा आगावूपणा केला तर काय होऊ शकतं हे आम्ही पाकिस्तानला दाखवून दिलं आहे असंही ते म्हणाले.

'चिखलफेक' नितेश राणेंचा जामीन फेटाळला, 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

लष्करात येणार आणखी एक अस्त्र

पाकिस्तानातल्या बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणखी अत्याधुनिक शस्त्र-अस्त्रांनी सज्ज होणार आहे. भारताचा विश्वासू मित्र असलेल्या रशियाकडून भारत अत्याधुनिक रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. यासाठी 200 कोटींचा करार भारताने रशियासोबत केलाय. MI-35 या लढाऊ हेलिकॉप्टरवर ही क्षेपणास्त्र लावली जाणार असून त्यामुळे लष्कराची मारक क्षमता वाढणार आहे.

भारताच्या लष्कराच्या शस्त्रपुरवढ्यात सर्वात जास्त खरेदी ही रशियाकडून केली जाते. आपल्या खेरदीपैकी 70 टक्क्यांच्या आसपास खरेदी ही रशियाकडून केली जाते. तर रशियाही भारताला शस्त्र विक्रीसाठी तत्पर असतो. याच टप्प्याचा भाग म्हणून ही खरेदी केली जाणार आहे. अचूक निशाणा आणि अजस्त्र क्षमता या नव्या क्षेपणास्त्रांची असणार आहे.

गुजरात : दोन काँग्रेस आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी, राहुल गांधींवर गंभीर आरोप

कमी उंचीवरून मारा पण शत्रूच्या टप्प्यात येणार  नाही असं या हेलिकॉप्टरचं वैशिष्ट आहे. त्याच्यावर ही नवी यंत्रणा लावल्यास या हेलिकॉप्टरची मारक क्षमता कितीतरी पट जास्त होणार आहे. तातडीच्या खरेदीअंतर्गत ही खरेदी केली जाणार आहे. लष्कराच्या मागणी विभागाने काही दिवसांपूर्वीच संरक्षणंत्री राजनाथसिंग यांच्यापुढे या क्षेपणास्त्राचं सादरीकरण केलं होतं. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला गेला.

First published: July 5, 2019, 8:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading