देशाचे पहिले CDS होणार लष्करप्रमुख बिपिन रावत, सांभाळणार तिन्ही सैन्याची कमान

संरक्षण मंत्रालयाने चीफ ऑफि डिफएंस स्टाफच्या पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 65 वर्षे करण्याच्या नियमात बदल केले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत (Bipin Rawat) हे पहिले चीफ डिफेंस स्टाफ होऊ शकतात अशी ही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ समितीने रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 15 ऑगस्ट रोजी भारतातीच्या तीन सैन्यांचे प्रमुख म्हणून सीडीएस असतील अशी घोषणा केली होती. बिपिन रावत 31 डिसेंबर रोजी सैन्यातून निवृत्त होत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीडीएस अन्य सैन्य प्रमुखांप्रमाणेच असतील. प्रोटोकॉलच्या यादीमध्ये सीडीएस सेना प्रमुखांच्यावर असेल.

संरक्षण मंत्रालयाने चीफ ऑफि डिफएंस स्टाफच्या पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 65 वर्षे करण्याच्या नियमात बदल केले आहेत. तीन सैन्यातील कोणत्याही प्रमुखांची नेमणूक केल्यास सैन्य, नौदल आणि भारतीय वायुसेनेच्या सेवा नियमात बदल केला गेला आहे. सेवानिवृत्तीचे वय संरक्षण प्रमुखांच्या कमाल वयाच्या 65 वर्षांपर्यंत वाढवण्यात येईल.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद तीन सैन्यांपेक्षा वरचे आहे. 1999 च्या कारगिल युद्धापासून सुरक्षा तज्ञ ही मागणी करत आहेत. कारगिलनंतर तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या गटाने (GOM) देखील सीडीएसला तिन्ही दलांमध्ये चांगले समन्वय स्थापित करण्याची शिफारस केली होती. जीओएमने आपल्या शिफारशीत म्हटले होते की, जर कारगिल युद्धाच्या वेळी अशी यंत्रणा असती तर तिन्ही सैन्य अधिक चांगल्या समन्वयाने रिंगणात उतरले असते आणि नुकसान फारच कमी झाले असते. त्यानंतर आता 20 वर्षानंतर याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

इतर बातम्या - VIDEO : 'मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की...'

बर्‍याच देशांमध्ये आहे CDS सिस्टम

अमेरिका, चीन, युनायटेड किंगडम, जपानसह जगातील बर्‍याच देशांमध्ये चीफ ऑफ डिफेन्स सारखी व्यवस्था आहे. नॉटो देशांच्या सैन्यामध्ये ही पदे आहेत. असे म्हटले जाते की, मर्यादित स्त्रोतांसह विस्तृत जमीन, लांब सीमा, किनारपट्टी आणि राष्ट्रीय सुरक्षा या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताला एकात्मिक संरक्षण प्रणालीसाठी संरक्षण प्रमुख पदाची मोठी आवश्यकता होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 03:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading