ज्या घरांत आयुष्य गेलं ती घरेच महापूरात डोळ्यांसमोर वाहून गेली, VIDEO पाहून बसेल धक्का!
ज्या घरांत आयुष्य गेलं ती घरेच महापूरात डोळ्यांसमोर वाहून गेली, VIDEO पाहून बसेल धक्का!
पाण्याचा वेग कायम होता. त्याच प्रवाहात ही सर्व घरे लोकांच्या डोळ्यांसमोर पाण्यात बुडाली. आपली राहिती घरच पाण्यात गेल्याने या लोकांना मोठा धक्का बसला आहे.
अररिया 25 सप्टेंबर: देशातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्यांना महापूर आला आहे. नद्यांचं पाणी काठवरच्या गावांमध्ये शिरलं असून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. बिहारमधल्या नुना नदीला महापूर आला होता. या पूरामध्ये गावातली 12 घरे वाहून गेली. त्यामुळे या कुटुंबांवर आता मदत छावणीत राहण्याची वेळ आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात पाण्याचा वेग आणि भीषणता दिसून येत आहे.
अररिया पडरिया भागात नुना नदी इथल्या लोकांची जीवन वाहिनी आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो. त्यामुळे नदी काठच्या लोकांना त्यांचा मोठा फटका बसत असतो. गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने नदीला पूर आला होता. त्यात 12 घरांचा पाया खचला होता. त्यामुळे त्या घरात राहणाऱ्या सर्वांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले होते.
अररिया (बिहार) - नुना नदीला आलेल्या महापूरात नदी काठी असणारी 12 घरे लोकांच्या डोळ्यांसमोर वाहून गेली. pic.twitter.com/xjVJTEvLDq
शुक्रवारी सकाळी पूर थोडा कमी झाला मात्र पाण्याचा वेग कायम होता. त्याच प्रवाहात ही सर्व घरे लोकांच्या डोळ्यांसमोर पाण्यात बुडाली. आपली राहिती घरच पाण्यात गेल्याने या लोकांना मोठा धक्का बसला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने कुठलीही मदत केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.