Home /News /national /

चीनला मोठा दणका! भारतात आल्या Appleच्या 8 मोबाईल फॅक्ट्री, अमेरिकेचीही साथ

चीनला मोठा दणका! भारतात आल्या Appleच्या 8 मोबाईल फॅक्ट्री, अमेरिकेचीही साथ

'भारताला चीन (China), अमेरिका (US), ब्रिटेन (UK), जापान (Japan) आणि ऑस्ट्रेलिया (Austrailia) या देशांचं समर्थन मिळालं आहे.'

    नवी दिल्ली 07 सप्टेंबर: भारत आणि चीनमधल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीन विरुद्ध मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आर्थिक आणि मुत्सद्देगिरीच्या पातळीवर भारताने प्रयत्न केले असून त्याला यशही येत आहे. जगातली सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या Appleने चीनमधून भारतात तब्बल 8 फॅक्ट्री स्थानांतरीत केल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. प्रसाद हे जगभरात असलेल्या बिहारच्या नागरीकांशी संवाद साधत होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, भारत आता जगाचं प्रॉडक्शन हब म्हणून उदयास येत आहे. बदलत्या परिस्थितीचा संधी म्हणून उपयोग करून भारत फायदा करून घेणार आहे. भारताला चीन (China), अमेरिका (US), ब्रिटेन (UK), जापान (Japan) आणि ऑस्ट्रेलिया (Austrailia) या देशांचं समर्थन मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, चीन मधून आयात होणारं औषध सिप्रोफ्लोक्सासिन (Anti-Bacterial Drug Ciprofloxacin)वर Anti-Dumping Duty लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यामुळे चिनी औषध कंपन्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भातला निर्णय घेतला आहे. Made In China असं लिहिलेल्या औषधांवर हा कर लागणार आहे. ओषधं चीनमधून किंवा इतर देशांमधूनही आयात करण्यात आली तरही त्यांना Anti-Dumping Duty दयावी लागणार आहे. चिनी सैनिकांनी अरुणाचलमधल्या 5 जणांचं केलं अपहरण, काँग्रेस MLA चा धक्कादायक दावा देशातल्या काही कंपन्यांच्या तक्रारींच्या आधारे चौकशी करून हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अभ्यास केल्यानंतर भारतातल्या कंपन्यांना नुकसान होत असल्याचं आढळून आलं होतं. 2015-16 मध्ये 117 औषधांसाठीचा कच्चा माल आयत करण्यात आला होता. 2018-2019मध्ये त्याचं प्रमाण हे 377 टनांवर गेलं होतं. त्यामुळे देशी कंपन्यांना होणारं नुकसान थांबविण्यासाठी चिनी आयातीवर अँटी-डम्पिंग ड्यूटी लावण्याची शिफारस करण्यात आली. आक्रमक धोरण सोडलं तरच शांतता, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी चीनला सुनावलं भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या गंभीर तणावादरम्यान भारताने चीनवर आणखी एक डिजिटल स्ट्राइक केला आहे. भारत सरकारने बुधवारी 118 चिनी मोबाइल अॅप्सवर बंदी लावली. यामध्ये PUBG व्यतिरिक्त Baidu, APUS लॉन्चर प्रो सारख्या अॅप्सचाही समावेश आहे. भारताने चीनविरोधात घेतलेल्या निर्णयानंतर चीनची तंतरली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या