'भाजपवाल्यांनो, कितीही गुंडागर्दी करा पण....'; घरावर हल्ल्यानंतर 'आप' नेत्याचा इशारा

'भाजपवाल्यांनो, कितीही गुंडागर्दी करा पण....'; घरावर हल्ल्यानंतर 'आप' नेत्याचा इशारा

आप नेते संजय सिंग यांच्या घरावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून: गेल्या काही दिवसांपासून राम जन्मभूमीच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. अयोध्येतील राम मंदिराची जमीन ही मूळ किमतीपेक्षा अधिक भावात खरेदी करण्यात आली आहे आणि यात तब्बल 16 कोटींचा घोटाळा आहे असे आरोप आम आदमी पक्षाकडून भाजपवर करण्यात आले आहेत. तसंच विरोधी . पक्षातील काँग्रेसच्या काही नेत्यांकडूनही राम मंदिर ट्रस्टवर आरोप करण्यात येत आहेत. आज दुपारी आप नेते संजय सिग यांच्या घरावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा हल्ला नक्की भाजपच्या काही कार्यकर्त्यांनीच केला आहे असा आरोप संजय सिंग यांनी केला आहे.

आप नेते संजय सिंग (Sanjay Singh) यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या बाबतची बातमी दैनिक जागरणने दिली आहे. ' भाजपवाल्यांनो कितीही गुंडागर्दी करून घ्या मात्र प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठीच्या वर्गणीत चोरी होऊ देणार नाही. यासाठी माझी हत्या झाली तरी चालेल' अशा आशयाचं ट्विट संजय सिंग यांनी केलंय.

काही दिवसांपूर्वी आप नेते संजय सिंग यांनी राम मंदिराच्या जमीन खरेदीमध्ये तब्बल १६ कोटींचा घोटाळा झाला आहे असा आरोप केला होता.

हे वाचा - कुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ

तसंच राम मंदिरासाठी जमा करण्यात आलेल्या वर्गणीची चोरी करणाऱ्यांना अटक झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. तसंच काही दिवसांपूर्वी मझ्या अंगावर तेल टाकून मला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती असं संजय सिंग यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलंय.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: June 15, 2021, 3:30 PM IST

ताज्या बातम्या