बंदूक हाती घ्याल तर ठार मारले जाल, भारतीय लष्कराने दिला अखेर इशारा

बंदूक हाती घ्याल तर ठार मारले जाल, भारतीय लष्कराने दिला अखेर इशारा

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानच्या ISI या संघटनेचा हात होता, असे सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराने सांगितले.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी: पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी काल (सोमवारी) जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानच्या ISI या संघटनेचा हात होता, असे सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराने सांगितले. पुलवामा हल्ल्यात थेट पाकिस्तानचा थेट सहभाग होता अशी चर्चा केली जात होती. पण याबाबत आता थेट भारतीय सुरक्षा दलाने पाकिस्तान, पाकिस्तान लष्कर आणि दहशतवादी संघटना यांचा संबंध असल्याचे म्हटले आहे.

वाचा- Pulwama : 'हल्ल्यात पाकिस्तानी आर्मी आणि ISI चा हात', भारतीय सेनेचा खुलासा

अपडेट

-बंदूक हाती घ्याल तर ठार मारले जाल

-100 तासाच्या आत 3 दहशतवाद्यांचा खात्मा

-आत्मसमर्पण करा आणि शांतता प्रस्थापित करा

-दहशतवाद्यांच्या पालकांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगावे

-अन्यथा थेट त्यांना यमसदनी पाठवणार

-दहशतवादी संघटनांकडून युवकांना सहभागी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे

-'जैश'ने आयएसआयच्या मदतीने केला हल्ला

-गेल्या दोन महिन्यात हिमवृष्टीमुळे काही प्रमाणात घुसखोरी वाढलीvideo viral: 'कश्मीर किसी के अब्बा की जागीर नही', ४ वर्षांच्या नवेलीचा पाकला दम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 11:02 AM IST

ताज्या बातम्या