भाजप म्हणतंय काँग्रेस डेटा चोर, तर रवीशंकर प्रसाद 'लाॅ'लेस मंत्री, काँग्रेसचा पलटवार

भाजप म्हणतंय काँग्रेस डेटा चोर, तर रवीशंकर प्रसाद 'लाॅ'लेस मंत्री, काँग्रेसचा पलटवार

फेसबुकचा डेटा चोरी प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपलीये.

  • Share this:

21 मार्च : फेसबुकचा डेटा चोरी प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपलीये. भाजपने काँग्रेसवर हा डेटा निवडणूक जिंकण्यासाठी वापरणार का ? असा संशय व्यक्त केलाय. तर काँग्रेसने याला प्रत्युत्तर देत भाजपचे कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद हे लाॅलेस मंत्री आहे अशी टीका केलीये.

राजकीय डेटा अॅनालिस्स कंपनी केंम्ब्रिज अॅनालिटिकाने 5 कोटी फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा चोरी केल्याच्या आरोपामुळे जगभरात खळबळ उडालीये. या आरोपामुळे फेसबुक अडचणीत सापडलंय.  माहिती-प्रसारण आणि कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन फेसबुकला इशारा दिलाय. भारतीयांचा डेटा चोरी केला तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला नोटीस पाठवू असा इशारा दिला.

या प्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये वातावरण तापलंय. भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवर केंम्ब्रिज अॅनालिटिकाकडून मदत घेतल्याचा आणि भारतीय यूझर्सचा डेटा वापरल्याचा आरोप करण्यात आलाय.

भाजपचा आरोप

रवीशंकर प्रसाद यांनी एका वृत्तपत्राच्या बातमीचा दुजोरा देत काँग्रेसची केंम्ब्रिज अॅनालिटिकाशी जवळकी का आहे ?, काँग्रेस याचा वापर का करत आहे ?, याचा वापर निवडणुकांसाठी करणार आहे का ?, काँग्रेस फेक बातम्यांचा वापर करणार आहे का ?, राहुल गांधींची टि्वटर फाॅलोअरर्स वाढले आहे यासाठी याचा वापर करण्यात आला का ? असे प्रश्न प्रसाद यांनी उपस्थितीत केले.

काँग्रेसचं प्रत्युत्तर

काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपच्या आरोपांवर पलटवार केलाय. भाजपच्या फेकन्यूज फॅक्ट्रीचं हे नवी उत्पादन आहे. रवीशंकर प्रसाद यांनी ज्या प्रकारे खोटे आरोप केले आहे, त्यावरून ते लाॅलेस कायदेमंत्री आहे. खोटे आरोप करणे ही भाजपची सवय आहे अशी टीका सुरजेवाला यांनी केली. तसंच आम्ही अशा कोणत्याही कंपनीची मदत घेतली नाही. हा भाजपचा खोटा अजेंडा आहे असंही सुरजेवाला म्हणाले.

तर काँग्रेसच्या आयटी सेल प्रभारी दिव्या स्पंदना यांनी म्हटलंय की, केंम्ब्रिज अॅनालिटिका ही उजव्या पक्षांसाठी काम करणारी आहे. डाव्यांसोबत नाही. त्यांच्या वेबसाईटवरच भाजपसोबत काम करत असल्याचा दावा केलाय.

न्यूज 18 नेटवर्कने याबद्दल तपासणी केली असता या कंपनीने 2010 मध्ये बिहार निवडणुकीत मदत केल्याचा दावा केलाय. केंम्ब्रिज अॅनालिटिकाच्या वेबसाईटवर स्पष्टपणे नमूद केलंय की, आमच्या ग्राहकाने मोठा विजय मिळवलाय. आम्ही जे टार्गेट ठेवलं होतं त्याच्या 90 टक्के जागा जिंकल्या आहे. ही निवडणूक जेडीयूने जिंकली होती आणि त्यावेळी भाजप जेडीयू युती होती.

First published: March 21, 2018, 8:28 PM IST

ताज्या बातम्या