S M L

अनुपम खेर, राम माधव आणि स्वपन दासगुप्ता यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

अकाउंट हॅक झाल्याचं समजल्यानंतर ट्विटरने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या तिघांचंही अकाउंट सस्पेंड केलं आहे

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2018 05:01 PM IST

अनुपम खेर, राम माधव आणि स्वपन दासगुप्ता यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

06 फेब्रुवारी : एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर, भाजपचे सरचिटणीस राम माधव यांचे ट्विटर अकाऊंट तुर्किश आर्मी ग्रुप या हॅकर ग्रुपने हॅक केल्याची माहिती समोर येते आहे. तसंच राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचंही ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलंय.

अकाउंट हॅक झाल्याचं समजल्यानंतर ट्विटरने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या तिघांचंही अकाउंट सस्पेंड केलं आहे. राम माधव यांच्या ट्विटर अकाऊंटमधली सगळी माहिती आमच्याकडे गोळा केली आहे. त्यांचे अकाऊंट आम्ही हॅक केले आहे. असा संदेश या ट्विटर अकाऊंटवर येत आहे. तसंच I love pakistan असे लिहुन हे अकाऊंट आम्हीच हॅक केले असल्याचे तुर्किश आर्मी ग्रुपने म्हटलंय आहे. "आय सपोर्ट तुर्की" या नावाने देखील एक ट्विट करण्यात आले आहे.

तर अनुपम खेर यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिलीये. 'माझं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. मी सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे,  भारतातील माझ्या काही मित्रांकडून मला याबाबत समजलंय, ट्विटरला याबाबत मी कळवलं आहे' असं वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलताना अनुपम खेर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close