'NDA ला विरोध करणारे देशविरोधी'; निवडणूक रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

'NDA ला विरोध करणारे देशविरोधी'; निवडणूक रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

बिहार निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत

  • Share this:

पाटना, 23 ऑक्टोबर : बिहार निवडणुकीच्या (Bihar Election 2020) पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडी (NDA) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान आज भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली झाली. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की,  NDA च्या विरोधात आज जे लोक उभे आहेत, ते देशहिताच्या प्रत्येक निर्णयाचा विरोध करीत आहेत.

जम्मू-काश्मीर अनुच्छेद 370 हटविण्याचा निर्णय असो..हे लोक विरोध करीत होते. तीन तलाक विरोधात कायदा तयार करीत मुस्लीम महिलांना अधिकार देण्याचा मुद्दा असो..हे लोक तेव्हाही विरोध करीत होते.

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध ठिकाणी रॅली घेतली. विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, बिहार ती जागा आहे जेथे लोकशाहीचा मूळ आहे. जंगलराजमध्ये कधीही विकास आणि लोकशाहीचे मूल्य रूजू शकेल? बिहारला भ्रष्टाचार मुक्त सरकार मिळण्याचा हक्क आहे. मात्र हे कोण ठरवेल? स्वत: भ्रष्टाचारात अडकलेले लोक की त्याच्याविरोधात लढणारे लोक? पंतप्रधान पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा बिहारच्या नागरिकांनी या लोकांवर विश्वास ठेवला आहे, या लोकांनी बिहारसोबत आणि बिहारचा गौरव धुळीला मिळविला आहे. बिहारला लुटुन या लोकांनी स्वत:च घर भरलं आहे, आणि आपल्या नातेवाइकांनाही श्रीमंत केलं आहे.

यावेळ पंतप्रधान म्हणाले की, नुकतेच देशातील शेतीला आधुनिक करण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहे. बिहारमधील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल. याशिवाय बिहारच्या गावात छोट्या शहरांमध्येही कोल्ज स्टोरेजची व्यवस्था आणि त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 23, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या