PMOमधले हिंदुत्व विरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात, सुब्रम्हण्यम स्वामींचा खळबळजनक दावा

PMOमधले हिंदुत्व विरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात, सुब्रम्हण्यम स्वामींचा खळबळजनक दावा

'हिंदुत्व मानसिकता विरोधी अधिकारी हे देशभक्त अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे आणत आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 02 मार्च : भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी खळबळजनक दावा केलाय. त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयासंबंधातच दावा केल्याने खळबळ उडाली आहे. पंतप्रधान कार्यालयात हिंदुत्व विरोधी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे आणि हे अधिकारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप सुब्रम्हण्याम स्वामी यांनी केलाय. देशभर CAA विरोधी वातावरण आणि दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

हिंदुत्व मानसिकता विरोधी अधिकारी हे देशभक्त अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे आणत आहे. हे देशभक्त अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करू इच्छितात. मात्र त्यांना कारवाई करू दिली जात नाही असं त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऑफिस हे देशातलं सर्वात शक्तिशाही ऑफिस आहे असं असजलं जाते. मोदींची प्रशासनावर जरब आहे असंही मानलं जाते. त्यांचा मंत्र्यांपेक्षा अधिकाऱ्यांवरच प्रचंड विश्वास आहे अशी टीकाही केली जाते. या पार्श्वभूमीवर सुब्रम्हण्यम स्वामी यांनी असा दावा केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे अधिकारी फक्त पवारच नाही तर सुप्रिया सुळे यांच्याही संपर्कात असल्याचं स्वामी यांनी म्हटलं आहे. प्रत्येक मंत्रालयाच्या सर्व महत्त्वाच्या फाईल्स या पंतप्रधान कार्यालयाकडे येत असतात. धोरणात्मक निर्णय घेतानाही पंतप्रधान कार्यालयाचा सल्ला सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे स्वामींच्या या आरोपाने दिल्लीच्या राजकीय आणि प्रशासनिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे वाचा...

चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’, शिवसेनेची सडकून टीका

दिल्ली हिंसाचारानंतर आता मुंबईतही कलम 144 लागू

'हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला, आता काय करायचं?'

First published: March 2, 2020, 10:11 AM IST

ताज्या बातम्या