रायगढ, 7 मे : कोरोनाचं संकट घोंगावत असताना भारतीयांसाठी आजचा दिवस सलग दोन धक्कादायक बातम्या घेऊन आला आहे. आज सकाळी विशाखापट्टनम येथील एका पॉलिमर कारखान्यात वायू गळती झाल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पुन्हा एकदा गॅस लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. छत्तीसगढ येथील रायगढमधील एका पेपर मिलमध्ये वायू गळती (Gas leak in chhattisgarh) झाल्याने मजूर आजारी पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
रायगढचे एसपी संतोष सिंह यांनी सांगितले की मजूर मिलमधील एका टँकची साफसफाई करीत होते. यादरम्यान ते विषारी वायूच्या संपर्कात आले आणि गंभीर आजारी पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पुढे सांगितलं की, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मिल बंद होती. मालकाने मिल सुरू केल्यानंतर त्याची साफसफाई करण्याचे काम सुरू होते. यादरम्यान हा अपघात झाला. साफसफाई करीत असताना 7 मजूर विषारी वायूच्या संपर्कात आले आणि आजारी पडले. यामधील तिघांची प्रकृती गंभीर आहेत.
7 workers of a Paper Mill hospitalised after being exposed to a gas leak reportedly while cleaning a tank in the mill, 3 of them are in critical condition: Raigarh Superintendent of Police #Chhattisgarhpic.twitter.com/T5XqB3ixyQ
आंध्र प्रदेशातील के. आर. आर. व्यंकटपुरम गावात LG पॉलिमर औद्योगिक इमारतीत गॅस गळती झाल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे विशाखापट्टणम हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे या गॅस गळतीमुळे 10 जणांचा मृत्यू झाला असून 5000 हून अधिक लोक आणि प्राण्यांची प्रकृती बिघडली आहे. तीन जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तर 200 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.