Home /News /national /

काश्मिरी IAS पतीसोबत घटस्फोट घेणाऱ्या टॉपर टीना यांना आणखी एक धक्का; CM च्या आदेशानंतर फिरलं चक्र

काश्मिरी IAS पतीसोबत घटस्फोट घेणाऱ्या टॉपर टीना यांना आणखी एक धक्का; CM च्या आदेशानंतर फिरलं चक्र

2018 मध्ये टीना आणि आमिर अतहर यांचं लग्न झालं होतं, त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे

    जयपुर, 20 नोव्हेंबर : राजस्थानमध्ये (Rajasthan) कोरोना संसर्गाच्या (COVID-19) वाढत्या धोक्यादरम्यान गहलोत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने चार आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंगचे आदेश जारी केले आहेत. या यादीमध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल करणाऱ्या टीना डाबी यांच्याही नावाचा समावेश आहे.  टीना डाबी (Tina Dabi) यांच्यासह आयएएस निलाभ सक्सेना, निशांत जैन आणि अमित यादव यांच्याही नावांचा समावेश आहे. सरकारने या सर्व आयएएसना नव्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. या आयएएस अधिकाऱ्यांना मिळाली नवी जबाबदारी निलाभ सक्सेना, सीईओ भिवाड़ी एकीकृत विकास प्राधिकरण (BIDA) बोर्डाला उदयपुर स्मार्ट सिटी लिमिटेड, उदयपुरच्या सीईओच्या रुपात स्थानांतरित आणि नियुक्त करण्यात आलं आहे. अर्थ, (कर) विभाग, जयपुरचे संयुक्त सचिव, निशांत जैन यांना राजस्थान पर्यटन विभाग, जयपुरच्या निर्देशकाच्या रुपात नियुक्त करण्यात आलं आहे. टीना डाबी, सीईओ, जिल्हा परिषद सह अतिरिक्त जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ईजीएस आणि मुख्य परियोजना अधिकारी, श्रीगंगानगरला संयुक्त सचिव, अर्थ (कर) विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. अमित यादव, सीईओ, जिल्हा परिषद सह अतिरिक्त जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ईजीएस आणि मुख्य परियोजना अधिकारी, भरतपुर यांना नगर आयुक्त, जोधपुर (दक्षिण), जोधपुरच्या पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. हे ही वाचा-सुट्टीवर आलेल्या BSF जवानाची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या; मारेकरी फरार भीलवाडामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चर्चेत असलेली UPSC टॉपर टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2015 मध्ये टीनाने टॉप केलं होतं. तर अतहर हा दुसऱ्या क्रमांकवर होता. या दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं होतं. मात्र या IAS दाम्पत्याने घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. आम्ही पुढे एकत्र राहू शकत नाही, असे कारण देत घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. दोघेही 2016 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या टीका अर्थ विभागात संयुक्त सचिव आणि आमिर अतहर ईजीसीच्या सीईओपदी कार्यरत आहे. 2018 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या दोन वर्षातच त्यांनी घटस्फोटाची अर्ज दाखल केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rajasthan

    पुढील बातम्या