8 कोटी जनतेला मोफत गॅस सिलिंडर देण्यासाठी सरकारने उचललं आणखी एक मोठं पाऊल

लॉकडाऊनदरम्यान गरीबांना मोफत सिलिंडर उपलब्ध झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : कोरोनाव्हायरस (Coronavirus) या जीवघेण्या आजाराच्या संकटाला रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या  लॉकडाऊनमध्ये एलपीजीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी युएईचे राज्यमंत्री आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (अ‍ॅडनोक) ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अल जाबेर यांच्याशी या आठवड्यात दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 8 कोटी लोकांना उज्ज्वलाअंतर्गत तीन सिलिंडर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून मोफत दिले जात आहे.

सिलिंडर्सची कमतरता भासणार नाही

या बैठकीविषयी माहिती देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले, कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठी धोरणात्मक स्वरूपाच्या आधारे कार्य करण्याचे मान्य करण्यात आले आहे. ते म्हणाले की, भारताच्या विनंतीवरून जुबेरने एडीएनओसीमधून अतिरिक्त एलपीजी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे कोरोनाच्या संकटात 8 कोटी उज्ज्वला लाभार्थ्यांना मोफत तीन एलपीजी सिलिंडर्स पुरवण्यास मदत होईल.

1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत विनामूल्य सिलिंडर उपलब्ध असेल

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील सर्व ग्राहकांना येत्या तीन महिन्यांत मोफत रिफिलची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 पर्यंत ही मदत करेल. यात 8 कोटी लाभार्थ्यांना 14.2 किलो एलपीजी सिलिंडर मोफत मिळण्याचा हक्क आहे. यामध्ये एप्रिल 2020 च्या रिफिल किंमतीची किरकोळ किंमत उज्ज्वला लाभार्थ्यांच्या लिंक बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. याद्वारे ग्राहक विनामूल्य स्वयंपाकाचा गॅस खरेदी करण्यासाठी रक्कम वापरू शकतील.

संबंधित - धक्कादायक! कोरोनाशी दोन हात करणाऱ्या नर्सला घरमालकाने सांगितलं दुसरं घर शोधा

 

संपादन - मीनल गांगुर्डे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2020 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading