गोवा, 18 ऑगस्ट : गोव्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातला संघर्ष चांगलाच पेटला होता. अखेर, राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्यातून बदली करण्यात आली आहे. मलिक यांची आता मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर गोव्याच्या राज्यपालाचा अतिरिक्त पदभार हा भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देण्यात आला आहे.
गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा आज केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. सध्या गोव्याच्या राज्यपाल पदाचा अधिभार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देण्यात आला आहे.
सुशांत खरंच नैराश्याग्रस्त होता?आत्महत्येच्या 12 दिवसांआधीचे व्हॉट्सअॅप चॅट
गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यपाल मलिक यांच्यात विविध प्रश्नांवरून संघर्ष उभा राहिला होता.
सत्यपाल मलिक हे आधी जम्मू काश्मिरमध्ये होते. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2019 रोजी मलिक यांची गोव्यात नियुक्ती करण्यात आली होती. गोव्यात भाजपचे सरकार असल्यामुळे त्यांचे चांगले सूर जुळले होते.
पण अलीकडे मुख्यमंत्री सावंत यांनी काबो राजनिवासाकडे आणखी एक राजभवन बांधणार असल्याची घोषणा केली. राज्यात आधीच कोरोनाची परिस्थितीत असल्यामुळे आणि राज्याच्या आर्थिक बाजूचा विचार करून मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध केला होता.
आधी पुलावरुन दोघांना वाचवले अन् आज एका तरुणासोबत घडलं भयंकर, जालन्यातील घटना
कोरोनाच्या परिस्थितीतून राज्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, यासाठी संपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. नवे राजभवन सध्या तरी बांधण्याची कोणतीही गरज नाही, असा सल्ला मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. एवढंच नाहीतर गोव्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार कमी पडले अशी टीका ही मलिक यांनी केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री सावंत आणि भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
सावंत यांनी राज्यपालांच्या सल्ल्याला केराची टोपली दाखवत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर, या वादातून मलिक यांची बदली करण्यात आली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.