लोकसभेपूर्वी RSSची महत्त्वाची बैठक, निवडणुकीसाठी भाजपाचा अजेंडा ठरणार?

लोकसभेपूर्वी RSSची महत्त्वाची बैठक, निवडणुकीसाठी भाजपाचा अजेंडा ठरणार?

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात

• Share this:

भोपाळ, 8 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीतही सत्ता आपल्याकडेच कायम टिकून राहावी, यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, बरोबर लोकसभा निवडणुकीपूर्वीच मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये शुक्रवारी(8 मार्च ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या तीन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुका पाहता संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. आरएसएसच्या या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सहभागी होणार आहेत. 8 मार्च ते 10 मार्चपर्यंत ही बैठक सुरू राहणार आहे.  या बैठकीत देशातील समस्यांसंदर्भातील महत्त्वपूर्ण तीन प्रस्ताव आणि काही मुद्यांवर अहवाल मांडण्यात येणार आहे.

बैठकीपूर्वी गुरुवारी (7 मार्च)सरकार्यवाह भय्याजी जोशी, सह सरकार्यवाह सुरेश सोनी, दत्तात्रय होसबळे , डॉ. मनमोहन वैद्य आणि अन्य पदाधिकाऱ्यांची एक उच्च स्तरीय बैठक झाली. यामध्ये बैठकीसंदर्भातील तयारींना अंतिम स्वरुप देण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात विचारविनिमय करण्यात येणार आहे. संघाच्या सर्व सहकारी संघटनांचे मोठ-मोठे नेते बैठकी सहभागी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वपूर्ण अजेंडा निश्चित करण्यात येणार आहे.

#Visuals: 3-day annual meeting of Rashtriya Swayamsevak Sangh's Akhil Bharatiya Pratinidhi Sabha begins in Gwalior, Madhya Pradesh. pic.twitter.com/rIaaJxFNqS
— ANI (@ANI) March 8, 2019

Madhya Pradesh: 3-day annual meeting of RSS's Akhil Bharatiya Pratinidhi Sabha will begin in Gwalior, today.Akhil Bharatiya Pratinidhi Sabha is the highest decision making body in Rashtriya Swayamsevak Sangh.Nearly, 1400 RSS workers are expected to participate in the annual meet. pic.twitter.com/IbnjCPkIau
— ANI (@ANI) March 8, 2019

First published: March 8, 2019, 10:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading